राम देशपांड/ अकोला : भारतात पर्यटनासाठी येणार्या देश-विदेशातील पर्यटकांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करून पर्यटन मंत्रालयाने इन्क्रेडिबल इंडियाच्या मदतीने ह्यट्रिपगेटरह्ण अँप विकसित केले आहे. देशांतर्गत भ्रमंती करणार्या पर्यटकांना हे अँप मार्गदर्शक ठरणार असल्याचा दावा पर्यटन मंत्रालयाचा आहे.भारतात पर्यटनाला येण्यापूर्वी आवश्यक ती सर्व माहिती शोधून काढण्याचे काम पर्यटकांना करावे लागते. विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून आवश्यक माहिती हाती पडतेच असे होत नाही. देश विदेशातील पर्यटकांच्या सर्व गरजा ओळखून त्यांचे खर्या अर्थाने समाधान व्हावे या उद्देशाने अँन्ड्रॉईड मोबाईलवर वापरता येईल असे ह्यट्रिपगेटरह्ण अँप आहे. या अँपमुळे पर्यटकांना हॉटेल, विमान, रेल्वे, पर्यटन स्थळे आदिंची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.सद्या देशात पर्यटनाबाबत माहिती देणारे काही अँप अस्तित्वात असले तरी, त्यावर माहिती शोधण्यास पर्यटकांना बराच वेळ खर्ची घालावा लागतो. एवढा वेळ घालवून देखील पाहिजे ती माहिती उपलब्ध होत नाही. पर्यटकांना आता ही माहीती ट्रिपगेटर डॉट कॉम व इन्क्रेडिबल इंडियाच्या अँपवर मिळेल. या अँपवर देशातील प्रत्येक प्रसिद्ध पर्यटनस्थळासह जवळपासच्या पर्यटनस्थळे तसेच एटीएम, पेट्रोलपंप, हॉटेल, रेस्टॉरंट तसेच वैद्यकीय सुविधांची देखील माहिती पुरविण्यात आली आहे. याशिवाय हॉटेल्स, रेस्टॉरेंट मधील खाद्यपदार्थांचे दर देण्यात आले असल्याने पर्यटकांना परवडणारे हॉटेल आणि रेस्टॉरेंट फक्त एका क्लिकवर शोधता येणार आहे. हे अँप केवळ माहिती देणारे असून, या माध्यमातून कोणताही व्यवहार केला जाणार नसल्याचे पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
ट्रिपगेटर’ अँप ठरणार पर्यटकांसाठी मार्गदर्शक
By admin | Updated: January 1, 2015 01:54 IST