शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन

By admin | Updated: December 4, 2014 00:38 IST

शासनाचा पुढाकार: अभियांत्रिकी व राज्य दुय्यम न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण देण्याचा निर्णय.

खामगाव (बुलडाणा): महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेत अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी ७ टक्के आरक्षण आहे; मात्र गत काही वर्षांपासून अनुसूचित जमातीचे उमेदवार अन्य प्रवर्गाच्या उमेदवारांच्या तुलनेत कमी पडत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणार्‍या अभियांत्रिकी व राज्य दुय्यम न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेचे पूर्वप्रशिक्षण देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने भरण्यात येणार्‍या अभियांत्रिकी पदांसाठी स्पर्धा परीक्षेचे पूर्वप्रशिक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना देण्याबाबतचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य न्यायिक दुय्यम सेवेतील पदांकरीता बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र अँण्ड गोवा या संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे.*प्रबोधिनीचा प्रशिक्षण कालावधी दोन महिन्यांचा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ आणि गट-ब करीता पदांची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गातील आयोगास अर्ज पाठविणार्‍या उमेदवारांची माहिती जलसंपदा व आदिवासी विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे या संस्थेमार्फत उमेदवारांची पूर्वचाळणी/चाचणी परीक्षा घेण्यात येईल. पूर्वचाळणी परीक्षेमध्ये निवड झालेल्या कमाल ६0 उमेदवारांनाच आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांची मुलाखतीसाठीची सर्वंकष तयारी प्रशिक्षण संस्थेकडून करून घेण्यात येईल.