शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी घेतले पहाडसिंगी गाव दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 02:16 IST

गावक-यांनी केला पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात गावाचा विकास करण्याचा संकल्प.

खेट्री (जि. अकोला): अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पातूर तालुक्यातील पहाडसिंगी हे डोंगरदर्‍यांमध्ये वसलेले आदिवासी गाव दत्तक घेतले आहे. या बाबीची घोषणा पालकमंत्र्यांनी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी गावाला दिलेल्या भेटीदरम्यान गावकर्‍यांच्या आयोजित सभेत दिली. यावेळी गावकर्‍यांनी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात गावाचा विकास करण्याचा संकल्प केला. पहाडसिंगी हे गाव डोंगरदर्‍यांमध्ये निसर्गरम्य वातावरणात वसलेले असले तरी या गावाचा आजपर्यंंत फारसा विकास झालेला नाही. या गावाला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संध्याकाळी ७ वाजता आकस्मिक भेट दिली. यावेळी गावात अगदी गल्लीबोळात फिरून त्यांनी समस्या जाणून घेतल्या. या गावात मुख्य समस्या पाणी, रस्ते, विद्युत पुरवठा या स्वरूपाच्या आहेत. गावातून फिरून आल्यानंतर पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांची सभा घेतली. या सभेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिकराव आखरे, पातूर तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते रमण जैन, पातूर पंचायत समितीचे सभापती लोखंडे, पहाडसिंगीचे सरपंच सदाशिव चव्हाण, श्रीकांत बराटे, पातूर तालुका शिवसेनाप्रमुख रवींद्र मुर्तडकर, परमानंद श्रीराम, प्रवीण देशपांडे, बाळापूरचे उपविभागीय अधिकारी राम लठाड, पातूरचे तहसीलदार राजेश वझिरे, पातूरचे गटविकास अधिकारी मुरकुटे, कनिष्ठ अभियंता चितारे, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मोरे, कृषी अधिकारी मकासरे तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.