शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांच्या खर्चाला ‘जीएसटी’चा धाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:00 IST

आदिवासींच्या शेतात शेततळे खोदणे,  प्लास्टिक अस्तरीकरण, कुंपणाच्या कामासाठी  २0१४-१५ मध्ये मिळालेला २९ लाखांचा निधी  ‘जीएसटी’च्या कचाट्यात अडकला आहे. या निधी तून कामे करताना जीएसटीच्या कपातीबाबत काय  करावे, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या  अकोला प्रकल्प अधिकार्‍यांनी शासनाकडे मार्गदर्शन  मागविल्याची माहिती आहे. 

ठळक मुद्दे२९ लाखांच्या खर्चासाठी आदिवासी विभागाने  मागविले मार्गदर्शनआत्महत्याग्रस्त जिल्हय़ात शेततळ्यांचा निधी पडून

सदानंद सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आदिवासींच्या शेतात शेततळे खोदणे,  प्लास्टिक अस्तरीकरण, कुंपणाच्या कामासाठी  २0१४-१५ मध्ये मिळालेला २९ लाखांचा निधी  ‘जीएसटी’च्या कचाट्यात अडकला आहे. या निधी तून कामे करताना जीएसटीच्या कपातीबाबत काय  करावे, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या  अकोला प्रकल्प अधिकार्‍यांनी शासनाकडे मार्गदर्शन  मागविल्याची माहिती आहे. केंद्रीय साहाय्य योजनेंतर्गत २0१४-१५ मध्ये  अनुसूचित जमातींच्या योजनांसाठी निधी देण्यात  आला. अकोला प्रकल्पातील अकोला, वाशिम,  बुलडाणा जिल्हय़ासाठी २४ नोव्हेंबर २0१५ रोजी हा  निधी आदिवासी विकास विभागाला मिळाला. शे तकर्‍यांच्या शेतात शेततळे खोदकाम करणे, त्यामध्ये  पाण्याचा साठा अधिक टिकून राहावा, यासाठी  प्लास्टिक अस्तरीकरण करणे, तारेचे कुंपण घेणे, या  योजनेसाठी २९ लाख रुपये देण्यात आले. त्यातून  तीनही जिल्हय़ातील २३ लाभार्थींची निवड करून  त्यांना प्रत्येकी १ लाख २३ हजारांपेक्षाही अधिक र क्कम त्यासाठी देता येते; मात्र योजना राबविण्यासाठी  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दाद न  दिल्याने हा निधी गेल्या दोन वर्षांपासून खर्च न  झाल्याची वस्तुस्थिती आहे.  आदिवासी विकास  विभागाच्या अकोला प्रकल्प कार्यालयाने योजना  राबविण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  कार्यालयासोबत ३१ जुलै २0१५ ते ३१ ऑगस्ट  २0१६ या काळात सातत्याने पत्रव्यवहार केला.  त्यासाठी कोणताच अभिप्राय न दिल्याने योजना  राबविणेच थांबले. त्यातून आदिवासी शेतकर्‍यांवर  अन्याय होत आहे. 

आत्महत्याग्रस्त जिल्हय़ात शेततळ्यांचा निधी पडूनविशेष पश्‍चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण  मोठे आहे. ते रोखण्यासाठी सिंचन ही प्रमुख उ पाययोजना आहे. शासनाकडून त्यासाठी निधी  मिळाला, तरी तो खर्च करण्यात अधीक्षक कृषी  अधिकारी कार्यालयाकडून किती दिरंगाई केली जात  आहे, याचे उत्तम उदाहरण त्यातून पुढे येत आहे. 

शेततळ्यांचा निधी खर्च कसा करावा..!दोन वर्षांपासून निधी मिळाला असताना तो खर्च  झाला नाही. आता शेततळे अस्तरीकरण आणि कुंपण  साहित्याच्या दरात ‘जीएसटी’नुसार रकमेची कमी  किंवा जास्त तफावत असल्यास लाभ कसा द्यावा,  याबाबतचे मार्गदर्शन शासनाकडून मागविण्यात  आले, असे आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प  अधिकारी विनिता सोनवणे यांनी सांगितले.