शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ पावती तपासणीच्या नावाखाली महामार्गावर ट्रकचालकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:58 IST

राष्ट्रीय महामहामार्गांवर जीएसटी पावती तपासणीच्या नावाखाली ट्रकचालकांना लुबाडणूक होत आहे.

ठळक मुद्देकोंढाळीजवळील घटना गुड्स गॅरेजच्या संचालकांची तक्रार

 संजय खांडेकर,अकोला : जीएसटी (वस्तू व सेवा कर)च्या अंमलबजावणीनंतर देशातील वस्तू आणि सेवा कर स्वस्त होणार, असा दावा व्हायचा; मात्र प्रत्यक्षात जीएसटीचा लाभ कमी आणि ताप जास्त होत असताना दिसत आहे. एकीकडे जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणी अधिकारी वर्ग सर्वंकष प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे मात्र राष्ट्रीय महामहामार्गांवर जीएसटी पावती तपासणीच्या नावाखाली ट्रकचालकांना लुबाडणूक होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा प्रकार सर्रास घडत असून, यासंदर्भात जीएसटी पोर्टलवर तक्रार दाखल झाली आहे.जीएसटीमुळे अनेक वस्तूंवर अतिरिक्त कराचा भार पडला असून, देशभरातील बाजारपेठेवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लागल्याने माल वाहतुकीवरही त्याचा विपरीत परिणाम जाणवत आहे. विविध वस्तूंचे दळणवळण करण्याचे प्रमुख माध्यम मालवाहू ट्रक आहेत. महाराष्ट्रातून विविध राज्यांत वेगवेगळ्या प्रकारचा माल पोहोचविला जातो आणि आणला जातो. जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीत व्हॅट गोठविला गेला आहे. जीएसटीमुळे अनेक कंपन्यांच्या उत्पादनात बदल झाला आहे. काहींनी पावती पुस्तकांवर जीएसटी क्रमांक टाकला असून, काहींनी अजूनही जीएसटी कोड टाकलेला नाही. याचा गैरफायदा घेत राष्ट्रीय महामार्गांवर काही ठिकाणी पोलिसांकडून तर काही ठिकाणी वेगवेगळ्या पथकांकडून जीएसटी पावत्यांची तपासणी केली जात आहे. पावती दाखविल्यानंतरही ट्रकचालकास पाचशे, हजार रुपयांची मागणी केली जात आहे. हा प्रकार मोठ्या प्रमाणात नागपूरजवळच्या कोंढाळी नाक्याजवळ होत आहे. अकोल्यातील श्रीराम गॅरेजच्या ट्रकचालकांना या प्रकारामुळे हजारो रुपयांचा भुर्दंड विनाकारण सोसावा लागला आहे. श्रीराम गुड्स गॅरेजचे संचालक जावेद खान यांनी याप्रकरणी जीएसटी परिषदेच्या पोर्टलवर आणि अकोला जीएसटी कार्यालयातील उपायुक्त यांच्याकडे तक्रार नोंदविली आहे. आता वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.- जीएसटी अंमलबजावणीची प्रक्रिया कायदेशीर मार्गाने सुरू आहे. जीएसटीचे अधिकारी अद्याप महामार्गावर उतरले नाहीत. जीएसटी पावती तपासणीचे काम पोलिसांचे नाही. ट्रकचालकांनी महामार्गावर कोणालाही चिरिमिरी देऊ नये. तशी मागणी झाल्यास ट्रकचालकांनी किंवा गुड्स गॅरेजच्या संचालकांनी जीएसटी परिषदेच्या पोर्टलवर थेट तक्रार नोंदवावी. अशा गंभीर तक्रारींची दखल घेण्यात येईल.-सुरेश शेंडगे, उपायुक्त जीएसटी कार्यालय अकोला.