शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’मध्ये वहिखात्यांचा नीट सांभाळ आवश्यक

By admin | Updated: September 20, 2016 01:33 IST

विदर्भ चेंबरमध्ये पार पडलेल्या ‘जीएसटी’वरील कार्यशाळेत बी.सी. भरतिया यांचे प्रतिपादन.

अकोला, दि. १९- देशातील सर्वात मोठी कर सुधारणा जीएसटी कायद्याने होत आहे. त्याचे सर्व व्यापार्‍यांनी स्वागत करावे.जीएसटी प्रणाली व्यापार्‍यांसाठी चांगली आहे. मात्र त्यासाठी व्यवहारातील दैनंदिन वहिखात्यांचा नीट सांभाळ होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी केले. विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसच्या कार्यालयात सोमवारी झालेल्या जीएसटी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.एकत्रित करामुळे व्यापारी उद्योजकांना दिलासा मिळणार असला तरी, यासाठी व्यापार्‍यांनी देखील आपली मानसिकता तयार ठेवणे गरजेचे आहे. जीएसटीबाबत अत्यंत प्राथमिक माहिती भरतीया यांनी दिली. येत्या १ एप्रिल २0१७ पासून जीएसटी लागू होत असून, याची संपूर्ण माहिती व्यापारी आणि उद्योजकांनी ठेवली पाहिजे. वकील आणि सीए यांच्या सल्ल्यानुसार व्यापार्‍यांनी वहीखाते तयार ठेवले पाहिजेत. कोणत्या व्यापार्‍यांसाठी जीएसटी प्रभावशाली आणि कोणासाठी तोट्याची ठरणार, याची माहितीही त्यांनी येथे दिली. दीड तासांच्या कार्यशाळेतील मार्गदर्शनानंतर भरतीया यांनी अर्धा तास व्यापार्‍यांच्या उपस्थित प्रश्नांची उत्तरे देत मार्गदर्शन केले. त्यानंतर अकोल्यातील एका बँकेच्या अधिकार्‍यांनी ऑनलाइन व्यवहारासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ चेंबरचे अध्यक्ष विजय पनपालिया होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकेश गुप्ता यांनी केले, तर आभार विवेक डालमिया यांनी मानले. विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसचे पदाधिकारी आणि शेकडो व्यापारी या कार्यशाळेला प्रामुख्याने उपस्थित होते. जीएसटीसंदर्भात चेंबरने वेळोवेळी अशा कार्यशाळा आयोजित करून व्यापार्‍यांना मार्गदर्शन करावेत, असे आवाहनही त्यांनी येथे केले.