शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायाला फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:38 IST

अकोला: जीएसटी (वस्तू व सेवा कर) अंमलबजावणी देशभरात जुलै महिन्यापासून सुरू झाली. ब्रॅण्ड नेमवर चालणार्‍या अनेक कंपन्यांनी लघू व्यापार्‍यांना थेट दिला जाणारा माल थांबविला. ज्या व्यापार्‍यांकडे जीएसटी कोड आहे, अशा व्यापार्‍यांनाच माल दिला जात आहे. त्यामुळे देशभरातील दळण-वळणावर परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देसंचालकांकडून मालवाहतुकीच्या भाड्यात कपातब्रॅण्ड नेमवर चालणार्‍या अनेक कंपन्यांनी लघू व्यापार्‍यांना थेट दिला जाणारा माल थांबविलाज्या व्यापार्‍यांकडे जीएसटी कोड आहे, अशा व्यापार्‍यांनाच माल दिला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जीएसटी (वस्तू व सेवा कर) अंमलबजावणी देशभरात जुलै महिन्यापासून सुरू झाली. ब्रॅण्ड नेमवर चालणार्‍या अनेक कंपन्यांनी लघू व्यापार्‍यांना थेट दिला जाणारा माल थांबविला. ज्या व्यापार्‍यांकडे जीएसटी कोड आहे, अशा व्यापार्‍यांनाच माल दिला जात आहे. त्यामुळे देशभरातील दळण-वळणावर परिणाम झाला आहे. मालवाहतूक करणार्‍या मालवाहू वाहनांना फारसे काम मिळत नसल्याने आता ट्रान्सपोर्ट संचालकांकडून मालवाहतुकीच्या भाड्यात कपात करण्यात आली आहे. अप्रत्यक्षरीत्या जीएसटी अंमलबजावणीचा आर्थिक फटका ट्रान्सपोर्ट संचालकांना सोसावा लागत आहे. वस्तू आणि सेवा कर लागल्यानंतर  सर्वसामान्य जनतेला महागाई कमी झाल्याचे जाणवेल, असा दावा अर्थशास्त्राशी जुळलेल्या जाणकारांकडून केला जात होता; मात्र वस्तुस्थिती काही वेगळीच समोर आली आहे. जीएसटीचे फायदे कमी आणि तोटेच जास्त अनुभवाला येत असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर साखर, तेल, शेंगदाणे, साबुदाण्याचे भाव वधारले. सर्वसामान्य जनतेला कराचा फटाका बसू लागला. लोकांकडून आणि व्यापार्‍यांकडून मागणी कमी झाल्यामुळे अप्रत्यक्षरीत्या ट्रान्सपोर्टचालकांचा चक्का जाम झाला आहे. जाम झालेल्या चक्क्याला गती मिळावी म्हणून ट्रान्सपोर्ट असोसिशनने देशपातळीवर मालवाहतुकीच्या भाड्याच्या दरात कपात केली आहे. मालवाहतुकीत कपात झाल्यानंतरही अद्याप विस्कटलेली घडी सुरळीत झालेली नाही. जीएसटी लागू होण्याआधी जूनमध्ये अकोला किराणा बाजारात  ५0 ते ६0, फळांच्या बाजारात ३0-३५, औद्योगिक वसाहतीत शेकडो ट्रक माल येत असे आणि असाच माल भरून अकोल्यातून रवाना होत असे. आता मात्र ही संख्या अध्र्यापेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळे व्यापार ठप्प होत आहे. व्यापारात मंदी आल्याने मालवाहतूक करणार्‍या ट्रान्सपोर्टच्या कामावर परिणाम दिसून येत आहे.

जीएसटीमुळे झालेला संभ्रमात अनेक जण पोळले जात असून, शासनाने कराबाबतचे धोरण निश्‍चित करावे. एकीकडे काम नाही अन् दुसरीकडे महामार्गांवर जीएसटीच्या नावावर लुटल्या जात आहे. मालवाहतुकीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आल्याशिवाय राहणार नाही.- जावेद खान, ट्रान्सपोर्ट व्यवसायीक, अकोला.