शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे विकास कामांवर गंडांतर

By admin | Updated: July 7, 2017 01:53 IST

मनपाच्या अमृत योजनेच्या ८७ कोटींसह १०३ कोटींची कामे प्रभावित; कंत्राटदार काम बंद करण्याच्या विचारात

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशभरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याचा परिणाम महापालिकेच्या विविध योजनांवरही दिसून येत आहे. जीएसटीमुळे मनपाच्या कंत्राटदारांना १८ टक्के कर जमा करावा लागणार असून, यामुळे अमृत योजनेच्या ८७ कोटींच्या कामांसह बांधकाम विभागामार्फत कार्यादेश देण्यात आलेल्या सुमारे १६ कोटी रुपये अशा एकूण १०३ कोटींच्या विकास कामांवर गंडांतर आले आहे. जुन्या कामांचे शासकीय दर व १ जुलैपासून लागू जमा करावा लागणारा १८ टक्के कर लक्षात घेता महापालिकेतील कंत्राटदार काम बंद करण्याच्या मानसिक तेत असल्याची माहिती आहे. केंद्र शासनाने देशभरासाठी ‘जीएसटी’कर प्रणाली लागू केली. १ जुलैपासून ही प्रणाली लागू झाल्यानंतर विविध साहित्याच्या किमतीत वाढ झाली. त्याचे परिणाम महापालिकेच्या विविध विकास योजनांवरही झाल्याचे दिसत आहे. शासनाने मंजूर केलेल्या ‘अमृत’योजनेअंतर्गत महापालिकेला २५४ कोटींपैकी पाणीपुरवठ्याची कामे निकाली काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात ११० कोटी १२ लाख रुपये मंजूर झाले. यापैकी ८७ कोटींच्या निविदेला शासनाने मंजुरी दिली. ‘एपी अ‍ॅन्ड जीपी असोसिएट्स’ एजन्सीची नियुक्ती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अमृत’ योजनेचे ई-भूमिपूजन करण्यात आले; परंतु जीएसटी लागू झाल्यास पाइपलाइनच्या किमतीत १२ टक्क्यांनी वाढ होणार असल्याने ही रक्कम कोण देणार, या मुद्यावरून एजन्सीने हात आखडता घेतला. त्यामुळे अद्यापपर्यंतही ‘अमृत’ योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकली नाही. १ जुलै रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना १८ टक्के जीएसटी आणि २.६६ टक्के प्राप्ती कर जमा करावा लागणार आहे. मनपामार्फत रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधांची कामे करताना कंत्राटदारांना सेवा करात सूट मिळत होती. प्रत्येक महिन्याला देयक प्राप्त होत नसले तरी कंत्राटदार त्यांच्या स्तरावर विकास कामे सुरू ठेवत होते. आता मात्र कंत्राटदारांना कामाचे कार्यादेश प्राप्त होताच त्यांना दर पंधरा दिवसांनी जीएसटी कर भरावा लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर रिटर्न सादर करताना जीएसटीचे विवरण द्यावे लागेल. अशा स्थितीत १८ टक्के कर पाहता अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे कंत्राटदार मनपामार्फत होणारी विकास कामे बंद करण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती आहे. जुन्या कामांना जीएसटी लागू!मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने १ जुलैपूर्वी सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान, दलितेतर योजना, नागरी दलित वस्ती योजनेंतर्गत सुमारे १६ कोटी रुपयांच्या कामाचे कार्यादेश जारी केले आहेत. जीएसटी लागू होण्यापूर्वी कंत्राटदारांना ४ टक्के विक्रीकर, २.६६ टक्के प्राप्ती कर, १ टक्का उपकर आणि अर्धा टक्के अधिभार असा एकूण ८ टक्के कर जमा करावा लागत होता. जीएसटीनुसार १८ टक्के कर जमा करावा लागेल. हा कर जुन्या कामांना लागू राहणार असल्यामुळे कंत्राटदारांना अतिरिक्त १० टक्के कराचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. नवीन शासकीय दराची घोषणाच नाही!सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरवर्षी जुलै महिन्यात बांधकाम साहित्यासाठी नवीन शासकीय दर घोषित केले जातात. ही नियमावली मनपाच्या बांधकाम विभागाला लागू पडते. १ जुलैपासून जीएसटी लागू होईल,याची पूर्वकल्पना असताना अद्यापपर्यंतही बांधकाम साहित्याचे शासकीय दर घोषित न केल्यामुळे मनपाच्या यंत्रणेसह कंत्राटदारांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.जीएसटी लागू झाल्यानंतर शासनाकडून विकास कामांच्या संदर्भात धोरण स्पष्ट होणे अपेक्षित होते. त्याविषयी अद्यापपर्यंत कोणतेही निर्देश नाहीत. बांधकाम साहित्याचे नवीन शासकीय दर लागू झाल्यानंतर पुढील निर्णय घेता येतील. -इक्बाल खान, शहर अभियंता, बांधकाम विभाग, मनपाजीएसटी लागू झाल्यानंतर अतिरिक्त १० टक्के कराचा भुर्दंड सहन करावा लागेल. कंत्राटदारांची आर्थिक स्थिती लक्षात घेता नवे शासकीय दर जाहीर झाल्यावर प्रशासनाने निविदा काढाव्यात तसेच जादा दराने निविदा स्वीकारावी, ही अपेक्षा आहे. नवीन कर प्रणालीमुळे विकास कामे तातडीने निकाली काढणे बंधनकारक झाले याचे समाधान आहे. - गोल्डी खांडपूर, कंत्राटदार महापालिका