शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी कंपोजिशन स्कीमचा उद्योजकांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:51 IST

अकोला : जीएसटी पोर्टलच्या सततच्या सर्व्हर डाउन तक्रारीमुळे  अकोल्यातील शेकडो उद्योजक-व्यापार्‍यांना कंपोजिशन स्कीमचे  रिटर्न फाइल करता आले नाही. दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी कं पोजिशन स्कीम जीएसटी पोर्टलवरून बंद करण्यात आली.  त्यामुळे शहरातील उद्योजकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा  लागणार असल्याचे चित्र आहे. जीएसटी परिषदेने कंपोजिशन  स्कीमची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी देशभरातील  उद्योजकांकडून समोर येत असली, तरी अद्याप जीएसटी परिषदेने  याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.

ठळक मुद्देसव्हर्र डाउनअभावी नोंदी रखडल्या परिषदेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जीएसटी पोर्टलच्या सततच्या सर्व्हर डाउन तक्रारीमुळे  अकोल्यातील शेकडो उद्योजक-व्यापार्‍यांना कंपोजिशन स्कीमचे  रिटर्न फाइल करता आले नाही. दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी कं पोजिशन स्कीम जीएसटी पोर्टलवरून बंद करण्यात आली.  त्यामुळे शहरातील उद्योजकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा  लागणार असल्याचे चित्र आहे. जीएसटी परिषदेने कंपोजिशन  स्कीमची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी देशभरातील  उद्योजकांकडून समोर येत असली, तरी अद्याप जीएसटी परिषदेने  याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.     वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)च्या कंपोजिशन स्कीमचा  लाभ घेण्यासाठी १६ ऑगस्ट ही शेवटची तारीख जीएसटी परिषदेने  दिली होती; मात्र गेल्या आठवडाभरापासून जीएसटीचे पोर्टल  सर्व्हर अनेकदा डाउन असल्याने या सेवेपासून अनेकजण वंचित  राहिलेत. त्यामुळे जीएसटी कंपोजिशन स्कीमची मुदत वाढविण्यात  यावी, अशी मागणी अकोल्यातून होत आहे. तशी ती इतर  ठिकाणाहूनही होत असावी. जुलैपासून देशभरात जीएसटी  कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. विविध स्लबनुसार विविध  व्यापारी-उद्योजकांना वस्तू आणि सेवेवर कर लावला गेला.  ऑगस्टमध्ये रिटर्न फाइल करण्याच्या तारखा दिल्या गेल्यात.  काहींनी रिटर्न फाइलही केलेत. जीएसटी पोर्टलचे सर्व्हर डाउन  असल्याने अनेकांना त्रास झाला. दरम्यान, ज्यांना रिटर्न नको  असेल, अशासाठी जीएसटीने कंपोजिशन स्कीम तयार केली होती;  मात्र त्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत नोंद आवश्यक होती. अनेकांनी या  स्कीमचा फायदा घेतला; मात्र अनेकांची नोंद सर्व्हर डाउन  असल्याने झाली नाही. त्यामुळे जीएसटी अधिकार्‍यांकडे तक्रारी  आल्यात; मात्र याप्रकरणी स्थानिक पातळीवर काहीएक अधिकार  नसल्याने त्यांना ऑनलाइन तक्रार करण्याचे सांगितले. आता  जीएसटी परिषद काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  कंपोजिशन स्कीमची तारीख पुन्हा नव्याने वाढून मिळावी, अशी  मागणी कर सल्लागार आणि उद्योजकांनी केली आहे.