शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी करवाढ; महापौरांचे विरोधकांना उत्तर

By admin | Updated: May 27, 2017 00:58 IST

अकोला: शहराचा विकास करण्यासाठी पैशाची नितांत गरज असते. यातील काही निधी शासनाकडून मिळतो तसेच नागरिकांकडून मिळणाऱ्या मालमत्ता करातून हा पैसा गोळा करावा लागतो.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहराचा विकास करण्यासाठी पैशाची नितांत गरज असते. यातील काही निधी शासनाकडून मिळतो तसेच नागरिकांकडून मिळणाऱ्या मालमत्ता करातून हा पैसा गोळा करावा लागतो. परंतु मागील १६ वर्षापासून मालमत्ता करात वाढ केलीच नाही. म्हणूनच यावेळी कर वाढीचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती महापालिकेचे महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली.शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर केंद्र आणि राज्य शासनामार्फत प्राप्त निधीत महापालिकेला आर्थिक हिस्सा जमा करणे आवश्यक आहे. अनेकदा शासनाकडून निधी प्राप्त होत असला तरी त्यामध्ये जमा करण्यासाठी मनपाकडे पैसा उपलब्ध राहत नसल्यामुळे शासनाचा निधी परत जातो. अकोलेकरांना मागील १६ वर्षांमध्ये कर आकारणी करण्यात आली नव्हती. या सर्व बाबींचे भान ठेवण्याची गरज असून, शहराच्या विकासासाठी कर वाढीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. विरोधकांचे आरोप सपशेल खोडून काढत महापौरांनी कर वाढीचे समर्थन केले.महापालिकेने शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर सुधारित करवाढीच्या नोटिस जारी केल्या. नागरिकांना दुप्पट, तीनपट कर आकारल्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. या मुद्यावर विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना व भारिप-बमसंने आंदोलनाचे हत्यार उपसताच विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी खुद्द महापौर विजय अग्रवाल पुढे सरसावले. शहरातील विकास कामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत असला तरी त्यामध्ये मनपाचा आर्थिक हिस्सा जमा होत नसल्यामुळे शासनाचा निधी परत जातो. त्याचा परिणाम विकास कामांवर होत असल्यामुळे शासनानेदेखील मनपाला उत्पन्न वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मालमत्तांचा सर्व्हे करून सुधारित कर लागू केल्याची माहिती महापौर अग्रवाल यांनी दिली. तरी शहराच्या विकासासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले, गटनेता राहुल देशमुख, सभागृहनेता गीतांजली शेगोकार उपस्थित होत्या. ‘सेल्फ असेसमेंट’चा गैरफायदा घेतला!१७ वर्षांपूर्वी मनपाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न करता ‘सेल्फ असेसमेंट’ ( नागरिकांनी स्वत: घर मोजून सांगितलेले क्षेत्रफळ) केले होते. सदर पुनर्मूल्यांकन किती प्रामाणिकपणे झाले असेल, याबद्दल शंका आहे. त्याचा मनपा कर्मचाऱ्यांसह मालमत्ताधारकाने गैरफायदा घेतल्यामुळे कराचे उत्पन्न वाढले नसल्याचे महापौरांनी सांगितले. बिल्डरांनी केली फसवणूकमनपाने पहिल्यांदाच ‘जीआयएस’ प्रणालीचा वापर करून मालमत्तांचे इमारत, प्लॉटचे क्षेत्रफळ गृहीत धरून सर्वेक्षण केले. सदनिकांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना खरेदी खतावर कमी क्षेत्रफळ दाखवून बिल्डरांनी सदनिकेची विक्री केली. मनपाच्या मोजमापात खरे क्षेत्रफळ समोर आल्यामुळे त्यावर वस्तुनिष्ठ कर आकारणी केल्याचे महापौर अग्रवाल यांनी स्पष्ट केले.विकासावरही बोलावे!सत्ताधारी असो किंवा प्रशासनाच्या निर्णयावर टीका, आरोप करण्याचे विरोधकांना अधिकार आहेत. जे विरोध करतात त्यांनीच या शहराची लूट चालवली आहे. आमचे ध्येय विकास कामांचे असून, शहरात सुरू असणाऱ्या विकास कामांवरही विरोधकांनी बोलावे, असा टोला महापौर विजय अग्रवाल यांनी कोणत्या पक्षाचे नाव न घेता हाणला.