शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानाचा भुईमुगाला फटका!

By admin | Updated: April 10, 2017 01:27 IST

संकट : महान परिसरात पाण्याची पातळी गेली खोल, कांद्याचे पीक सुकले

महान : दिवसेंदिवस वाढत असलेला तापमानाचा महान परिसरातील भुईमूग पिकाला फटका बसत आहे. पिके सुकली असून, पाण्याचा वापरही वाढला आहे. एकीकडे पाण्याची पातळी कमी झालेली असताना पाण्याची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांसमोर संकट वाढले आहे. महान व परिसरात यावर्षी शेकडो एकर जमिनीत शेतकऱ्यांनी भुईमूग पिकास पसंती देऊन पेरणी केली आहे.मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भुईमूग लागवड व पेरणीस एक महिना उशिराने झाली असल्याने सध्याच्या परिस्थितीत भुईमुगाचे पीक फुलावरच आहे. भुईमूग पिकास आठवड्यातून किमान एक दिवस निश्चित करून शेतकरीवर्ग पाणी द्यायचे; परंतु दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत असल्याने भुईमुगाचे पीक सुकत आहे, तर कांद्याचे पीक पिवळे पडत असून, शेतकरी संकटात पडला आहे. भुईमूग पिकांवर भर उन्हात मावा नामक रोगाने ग्रासले आहे.भुईमूग पिकांची परिस्थिती बघता भुईमुगास तिसऱ्याच दिवशी पाणी देण्यास शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्यांजवळ भरपूर पाणी आहे, त्यांना चिंता नाही; परंतु ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला कमी प्रमाणात पाणी आहे, त्यांची चिंता वाढली आहे. उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या कालावधीतच महान परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी खूप प्रमाणात कमी झाल्याने विहिरी उपशावर आल्या आहेत. या नवीन संकटामुळे तोंडातला घास हिरावून जाण्याची शक्यता आहे, तसेच महान व परिसरात यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केली असून, कांद्यावरसुद्धा उष्ण तापमानाचा फटका बसत असून, कांद्याचे पीक पिवळे पडत असून, माना टाकत आहे. उत्पादन घटण्याची शक्यता ४भुईमूग व कांदा या दोन्ही रब्बी पिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. उष्ण तापमानाचा फटका वरील दोन्ही पिकांना बसून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पिके तयार होण्यास एक ते दीड महिन्याचे अंतर बाकी आहे. ऐनवेळेवर विहिरीचे पाणी कमी होणार, याची थोडीफारही कल्पना शेतकऱ्यांना नव्हती. अगोदरच शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करून लागवड व पेरणी केली.त्यानंतर निंदण, डवरे, भरी, युरिया देऊन आवश्यक त्या वेळेस कीटकनाशकाची फवारणी केली. गेल्यावर्षीही बसला होता फटका मागच्या वर्षी कांद्याला भाव मिळाला नसून, शेतकऱ्यांना लावलेला खर्चही काढता आला नाही. त्या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांना बँकेकडून घेतलेले कर्जही फेडता आले नाही. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी करून यावर्षी भुईमूग पिकास प्राधान्य दिले. उष्ण तापमान व पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.