शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अकोट बाजार समितीत भुईमूग खरेदी ठप्प

By admin | Updated: May 24, 2017 01:20 IST

अकोट: अकोट बाजार समितीत भुईमुगाच्या शेंगाला कमी दर मिळत असल्याने २३ मे रोजी शेतकरी संतप्त झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: अकोट बाजार समितीत भुईमुगाच्या शेंगाला कमी दर मिळत असल्याने २३ मे रोजी शेतकरी संतप्त झाले होते. परिणामी कमी दरात भुईमूग विक्री करण्यास शेतकऱ्यांनी नकार दिल्याने खरेदी ठप्प पडली होती. दरम्यान, बाजार समिती सचिवांना भेटून शेतकऱ्यांनी कमी दर मिळत असल्याची तक्रार करीत रोष व्यक्त केला. अकोट बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भुईमुगाची आवक झाली आहे. बाजार समितीच्या आवारात भुईमुगाचे ढीग पडले आहेत. शासनाने भुईमूग शेंगाला ४,२२० एवढा हमीभाव ठरविला आहे; परंतु व्यापारी २,२०० ते ३,००० रुपये दराने भुईमुगाला भाव देत आहेत. दुसरीकडे इतर बाजारपेठेत मात्र ४,००० रुपयांच्या वर भुईमूग खरेदी सुरू आहे; परंतु मध्येच कमी दराने खरेदी केल्या जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांच्या दालनात जाऊन याबाबत तक्रार केली. भुईमूग लागवडीकरिता लागणारा खर्च व मिळणारे उत्पन्न पाहता शेतकऱ्यांचा आर्थिक बजेट बिघडला आहे. अशातच कमी दराने व्यापारी भुईमूग मागत असल्याने शेतकऱ्यांनी आज विक्रीस नकार दिला आहे. शेतकऱ्यांना कमी दर देऊन वेठीस पकडल्या जात असल्याने बाजार समिती सचिवांची भेट घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी खरेदी दरासंदर्भात चर्चा केली. दरम्यान, योग्य दर मिळत नसल्याने आज हरासीमध्ये शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला नसल्यामुळे बाजार समितीच्या आवारात भुईमुगाचे ढीग दिसून येत आहेत. भुईमुगाच्या दराबाबत व्यापाऱ्यांची चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. - राजकुमार माळवे, सचिव, कृउबास, अकोट