शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांमुळे भुईमूग व कांदा पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST

भुईमुगाच्या पिकांमध्ये रानडुकरे धुडगूस घालत असून, पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे पिकांची ...

भुईमुगाच्या पिकांमध्ये रानडुकरे धुडगूस घालत असून, पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे पिकांची राखणदारी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतातच रात्रंदिवस मुक्काम करण्याची वेळ आली आहे. परिसरात नीलगाय, हरणांचे कळप, रानडुकरे मोठ्या प्रमाणात असून, शेतातील पिकांमध्ये शिरून नुकसान करीत आहेत. याबाबत वन व वन्यजीव विभागाकडे अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु वनविभागाने दखल घेतली नाही. रानडुकरे अचानक हल्ला करीत असल्याने, शेतातील पिकांच्या रखवाली करण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्रंदिवस मुक्काम करून शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागत आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पिकांची राखणदारी करताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाडेगाव

परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राणी शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे पिकांची रक्षण करण्याठी रात्रीला शेतात मुक्काम करावा लागत आहे.

-अनंता रामराव काळे, शेतकरी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याच्या घटना परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा.

-प्रवीण सुरेश लोखंडे, शेतकरी वाडेगाव

परिसरात वन्यप्राण्यांनी धुडगूस घातला असून, पिकांची नासधूस करीत आहेत. त्यामुळे रात्रीला शेतात मुक्कामाला जावे लागत आहे. वन्य प्राण्यांनी पिकांची नासधूस केल्यानंतरही वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येत नाही.

-पुरुषोत्तम दुतोंडे,

शेतकरी बेलुरा