शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अडोशी येथे भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: June 19, 2017 04:44 IST

पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यासमोर ग्रामस्थांनी मांडली व्यथा.

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : तालुक्यातील अडोशी येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यासंमोर घागरी फोडून आपल्या व्यथा मांडल्या. जोगलखेड गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या व ३00 लोकांची वस्ती असलेल्या अडोशी येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी कुठलीही योजना नाही. गावात पाण्याचे इतर स्रोतही नसल्याने ग्रामस्थांना बाराही महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. चार ते पाच कि.मी. अंतरावरून ग्रामस्थ मिळेल त्या साधनाने पाणी आणत आहेत. गावात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत; मात्र त्याकडे अधिकारी आणि पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. गावात पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ४ ते ५ कि.मी. अंतरावरून पाइपलाइन टाकण्याची गरज आहे; मात्र निधी नसल्याने गावात पाइपलाइन टाकण्यात आलेली नाही. सध्या गावात भास्कर गावंडे यांच्या विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणीटंचाई जाणवणार आहे. पाणीटंचाईचे चटके सहन करणार्‍या ग्रामस्थांनी पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता मिलिंद जाधव, सरंपच गीता भरणे, उपसरपंच संगीता वाघ, सचिव काळे यांच्यासमोर महिलांनी घागरी फोडून आपला संताप व्यक्त केला, तसेच पाणीपुरवठय़ावर उपाययोजना करण्याची मागणी केली.