शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवासह वऱ्हाडी म्हणाले, ‘ मतदान करणारच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:40 IST

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होऊ घातले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असलेल्या भारतातील लोकसभेची निवडणूक म्हणजे राष्ट्रीय उत्सव झाला आहे.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होऊ घातले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असलेल्या भारतातील लोकसभेची निवडणूक म्हणजे राष्ट्रीय उत्सव झाला आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘स्वीप’तर्फे रुस्तमाबाद येथील विवाह सोहळ्यातील वºहाडींकडून ‘मी मतदान करणारच’, असे अभिवचन घेण्यात आले.बार्शीटाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथे गुरुवारी दिव्या दिनकर राऊत आणि अनिल पुंडलिक दाते यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या विवाह सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांमध्ये मतदानाप्रती जागरूकता व्हावी, यासाठी स्वीपचे जिल्हा समन्वयक प्रकाश अंधारे, महिला आर्थिक विकास मंडळच्या व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे यांनी मतदार साक्षरता अभियान राबविले. यासाठी त्यांनी थेट रुस्तमाबाद येथील लग्नमंडप गाठले. स्थानिक जय बजरंग शाळेच्या शिक्षिका पुष्पा गोल्डे आणि सावित्रीबाई फुले गाइड पथकाच्या सहकार्याने विवाह सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता केली.‘स्वीप’च्यावतीने मतदानाचा अधिकार निर्भय वातावरणात राबविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी गाइड पथकाच्या मदतीने महिला आणि पुरुषांकडून मतदान करण्याचे लेखी अभिवचन घेण्यात आले. विवाह सोहळा असणाऱ्या दिव्या-अनिल, वर-वधूंचे वडील यांनीही मतदान करण्याविषयी लेखी अभिवचन दिले. विवाह सोहळ्यासाठी आलेल्या नागरिकांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे अभिवचन उत्साहाने भरून दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, नोडल अधिकारी मनोज लोणारकर यांच्या मार्गदर्शनात मतदारांमध्ये जागरूकता घडवून आणण्यासाठी विविध कल्पक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक