शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेत तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

By admin | Updated: February 7, 2017 03:25 IST

आचारसंहिता भंग, इतर तक्रारींचे निरसन

अकोला, दि. ६- महापालिकेच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात तक्रारी करण्यासाठी निवडणूक आयोगाने ह्यकॉपह्ण मोबाइल अँप तयार केले. मोबाइल अँपच्या तक्रारीवर विसंबून न राहता महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मनपाच्या स्तरावर आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार स्वीकारण्यासाठी मनपात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित केला आहे. सोमवारी हा कक्ष सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. महापालिका निवडणुकीच्या महासंग्रामाला सुरुवात झाली असून राजकीय पक्षांचे उमेदवार, अपक्ष उमेदवार कामाला लागले आहेत. उद्या मंगळवारी निवडणूक रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीच्या मैदानात कायम राहणारे उमेदवार प्रचारादरम्यान धुराळा उडवतील, हे नक्की. उमेदवारी अर्ज कायम ठेवणार्‍या उमेदवारांकडून राजकीय पक्षांच्या प्रचार सभा, बैठकांचा धडाका सुरू होतो. त्यावेळी मतदारांना प्रलोभन दाखविणे, साहित्याचे वाटप करणे आदी प्रकार घडण्याची शक्यता आहे. ही बाब आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरणारी आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणार्‍या उमेदवारांच्या विरोधात सहसा कोणी तक्रार करीत नसल्याचा अनुभव आहे. अशा उमेदवारांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मनपा आवारात तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. हा कक्ष अकोलेकरांसाठी सोमवार पासून खुला करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग असेल किंवा मनपा निवडणुकीसंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास ती स्वीकारल्या जाणार आहे. अकोलेकरांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तक्रार निवारण कक्षात रीतसर तक्रार दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.