पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी, पीएसआय अमोल गोरे, पीएसआय मीरा सोनवणे तथा पोलीस कर्मचारीवृंद आणि समता युवक मंडळाच्या भीमसैनिकांनी पातूर-बाळापूर रस्त्यावरील मिलिंद नगर, संभाजी महाराज चौक, भीमनगर पुलाजवळ महामार्गावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकला. गेल्या अनेक महिन्यांपासून पातूर-बाळापूर महामार्गावर असंख्य खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे मालवाहू वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनाचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. वारंवार तक्रार देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत होते. अखेर पातूर पोलीस आणि भीमसैनिक यांनी संयुक्त पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने अभिनव उपक्रम राबवीत महामार्गवील खड्डे बुजविले. यामध्ये प्रामुख्याने निर्भय पोहरे, बळीराम खंडारे, मंगल डोंगरे, जितेश शिरसाट, सागर कढोणे, सचिन सुरवाडे, फिरोज खान, बाळू बगाडे, सुधाकर शिंदे, स्वप्निल सुरवाडे, सय्यद इम्रान, मंगेश गवई, निखिल उपरवट, शुभम गवई, बबलू तेलगोटे, संतोष वाघमारे, अक्षय सावळे, धीरज इंगळे, अमित खंडारे, विपुल पोहरे, विकास सरदार, धीरज खंडारे, सतीश सुरवाडे आदींनी सहभाग घेतला. (फोटो)
महामार्गावरील खड्डे बुजवून महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST