जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अधिक्षिका मीरा पागोरे तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद
अकोला - जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान व दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी मतमाेजणी हाेणार आहे. आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व निवडणुका कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच निवडणुका ह्या खुल्या व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.
वृद्ध साहित्यिक व कलावंतांचे प्रस्ताव आमंत्रित
अकोला - वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन या योजनेंतर्गत या वर्षाकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे, अशी व्यक्ती, कला व साहित्य क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्षे इत्यक्या प्रदीर्घ काळासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली अशा व्यक्ती, ज्या साहित्यिक, कलावंतांचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न रु. ४८००० पेक्षा जास्त नाही, वयाने वडील असणाऱ्या विधवा/ परितक्त्या वृद्ध साहित्यिका व कलावंत यांना मानधन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.