संतोष शंकरराव बराटे, नम्रता दिलीप इंगळे, रामेश्वर उपर्वट, भीमराव गंगाराम उपर्वट, प्रदीप उपर्वट, राहुल घनमोडे, धनंजय उपर्वट, नीलेश उपर्वट, वासुदेव उपर्वट, दिनकर उपर्वट, पुरुषोत्तम उपर्वट, गजानन उपर्वट, गौतम उपर्वट, महादेव सखाराम उपर्वट, देवेंद्र उपर्वट, राजेश जंजाळ, मधुकर उपर्वट, भीमराव नामदेव उपर्वट आदी उपस्थित होते.
------------------------
दानापूर येथे भीम जयंती साजरी
दानापूर: येथील ग्रामपंचायत कार्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सपना धम्मापाल वाकोडे, उपसरपंच सागर ढगे, ग्रामपंचायत सदस्य गोपाल विखे, निर्मला हागे, सुनीता घायल, रूपाली घायल, सिसोदिया ताई, गणेश सांगुनवेढे, योगेश येऊल, वासुदेव खवले, मीनाक्षी ढगे, यशोदा दांदळे, गोपाल मकोडे, राऊत, उन्हाळे आदी उपस्थित होते. तसेच येथील महाराष्ट्र विद्युत वितरण कार्यालयातही भीम जयंंती साजरी करण्यात आली. यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञा विठ्ठल शेळके, एस.एम. दारोकार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला बाळासाहेब तळोकार, संजय राऊत, प्रीतम पहुरकार, गजानन भड, अनिल बावसकर आदी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेतील कार्यक्रमात मुख्याध्यापक विश्वेश्वर पातुर्डे, शिक्षक सुताळे, ठोंबरे आदी उपस्थित होते.
------------------------------------------------
मनारखेड ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
पारस: बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथे महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच डॉ. सूरज पाटील लोड यांनी जलशुद्धीकरण यंत्राच्या ठिकाणी शीतल जलयंत्राचे उद्घाटन केले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांना २० लीटर थंड पाणी केवळ पाच रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी ग्रामस्थांना स्मार्ट कार्ड देण्यात आल्याची माहिती सरपंच डॉ. सूरज पाटील लोड यांनी दिली आहे.
---------------------------------------------
मनात्री येथे ग्रामपंचायत कार्यालयात भीम जयंती साजरी
मनात्री: तेल्हारा तालुक्यातील मनात्री येथे ग्रामपंचायत कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम उपसरपंच कैलास मनतकार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव थोरात, ग्राम पंचायत सदस्य अनंता मनतकार, से. स. सोसायटीचे अध्यक्ष दादाराव थोरात, शेषराव वानखडे आदी उपस्थित होते.
-------------------------------------
स्पर्धा परीक्षेची पुस्तकांचे वितरण करून भीमजयंती साजरी
सायखेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जामवसु येथील मित्र मंडळाने विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तकांचे वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. या उपक्रमासाठी जाम वसूकर मित्र मंडळाचे अध्यक्ष देवीदास वसू, प्रमोद लोखंडे, जगदीश जाधव, सचिन खरात, प्रमोद शेळके, संजय शिरसाठ, मोहन हिवराळे, वसंत पाटील, हनुमान उंबरकार, अमित विधाटे, युगल जोशी, पुरुषोत्तम पाटील, हरिदास गोपनारायण, संदीप जाधव, गजानन माघाडे, धम्मपाल कांबळे, गजानन उंबरकर, शैलेश शिरसाठ, प्रकाश तिवाले, भगवान कांबळे, बाळू शिरसाट, संजय खरात, गजानन आमटे, शामराव शिरसाट आदींनी परिश्रम घेतले.