अकोला. काटेपुर्णा अभयारण्यात अकोला वन्यजीव वन्यजीव विभाग, निसर्गकट्टा व प्राणीशास्त्र विभाग शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ फेब्रुवारी रोजी 'ग्रीन व्हॅलेंटाइन डे' हा उपक्रम घेण्यात आला होता. या उपक्रमात प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी श्रमदान करून काटेपुर्णा अभयारण्यातील नेचर ट्रेल जवळील जलाशयाच्या किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविली व पक्षी व वन्यप्राणी यांना घातक ठरणारा प्लास्टिकचा कचरा ज्या मध्ये चप्पला, बॉटल, पाकीटे व मच्छीमारी करणारे खराब नॉयलनचे जाळे इ. गोळा करून वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. पवार यांच्या कार्यालया जवळ जमा करण्यात आले. सोबतच पाणवठ्याच्या काठावर बारीक माती टाकून इंप्रेशन पॅड तयार केले. या उपक्रमाबाबत अधिक माहीती देतांनाचा निसर्गकट्टा चे अमोल सावंत यांनी सांगितले की, १४ फेब्रुवारी हा सर्वत्र व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा होतो. आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देणे, त्यांना भेट देणे, त्यांच्या सानिध्यात वेळ घालविणे अश्या अनेक गोष्टी लोकं या दिवशी करीत असतात. आपले प्रियजनांना ज्या जंगलामुळे - निसर्गमुळे शुद्ध हवा-पाणी मिळतं त्या जंगलाची व निसर्गाची सेवा करून आगळा वेगवेगळा व्हॅलेंटाइन डे साजरा करायचे ठरविले. ग्रीन व्हॅलेंटाइन डे... काटेपुर्णा अभयारण्य म्हणजेच पाणी देणारं जंगल, या जंगलात महान जलाशय आहे, या जलाशयाच्या काठावर पाणातून वाहून आलेले प्लास्टिकचा कचरा ज्या मध्ये चप्पला, बॉटल, पाकीटे व मच्छीमारी करणारे खराब नॉयलनचे जाळे नेहमी दिसायचे व मनाला अस्वस्थ करायचे. हे सर्व एकट्याने साफ करणे शक्य नव्हते. म्हणून शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना घेवून श्रमदान करायचे ठरविले एकुण ४० विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी व शिक्षकां सोबत जलाशयाच्या काठावरून सफाई मोहीम व पक्षी निरीक्षणाला सुरवात केली. जागो जागी पडलेले प्लास्टिकचा कचरा व नॉयलनच्या जाळे गोळा करीत, काटेपुर्णा अभयारण्यातील नेचर ट्रेल लगतचा किनारा संपुर्ण साफ केला तसेच जिथे जास्त वन्यजीव व पक्षी आढळतात तेथील भाग साफ केला.
काटेपुर्णा अभयारण्यात श्रमदानाने साजरा झाला 'ग्रिन व्हॅलेंटाइन डे'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 18:20 IST