शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या हरित स्वप्नावर अखेर फेरले पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:25 IST

पावसाळा संपत आला, तरी दमदार सार्वत्रिक पाऊस  झालाच नसल्याने विदर्भातील खरीप पिके प्रभावित झाली असून,  सोयाबीन पिकावर एकाच वेळी तीन ते चार जातीच्या कि डींनी हल्ला  केल्याने १७ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर  परिणाम झाला आहे. राज्यातील पिकांची स्थितीही अशीच आहे. या  नैसर्गिक संकटामुळे शेती अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची  शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देविदर्भातील १७ लाख हेक्टरवरील सोयाबीन हातचे गेलेखरीप पिकांची स्थिती चिंताजनक

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाळा संपत आला, तरी दमदार सार्वत्रिक पाऊस  झालाच नसल्याने विदर्भातील खरीप पिके प्रभावित झाली असून,  सोयाबीन पिकावर एकाच वेळी तीन ते चार जातीच्या कि डींनी हल्ला  केल्याने १७ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर  परिणाम झाला आहे. राज्यातील पिकांची स्थितीही अशीच आहे. या  नैसर्गिक संकटामुळे शेती अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची  शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.विदर्भात यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरवली. जुलैमध्ये  थोडाफार पाऊस आल्याने शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली, पण  पेरणीला तीन ते चार आठवडे उशीर झाला होता. त्यामुळे पिकांची स् िथती नाजूकच होती. पुन्हा पावसाचा दीर्घ खंड पडल्याने मुगाच्या  िपकावर प्रतिकूल परिणाम झालाच.सोयाबीनच्या पिकाला फुलोरा  आला होता; तथापि पाऊस आला नाही. ढगाळ वातावरण आणि  वाढलेले तापमान किडींना पोषक ठरले. सोयाबीन पिकांवर तर  चक्रीभुंगा, हेलीकोवर्पा आणि तंबाखूची पाने खाणार्‍या अळी,  किडींनी एकाचवेळी आक्रमण केल्याने हे पीक भुईसापट झाले आहे.  शेकडो शेतकर्‍यांनी या पिकावर नांगर फिरवला आहे. विदर्भात यावर्षी  १७ लाख हेक्टरवर सोयाबीन पीक आहे. यातील सर्वाधिक १३ लाख  ५१ हजार हेक्टर सोयाबीनची पेरणी पश्‍चिम विदर्भातील अकोला,  बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती जिल्हय़ात झालेली आहे.  या पाच जिल्हय़ांतच सर्वाधिक कमी पाऊस झाला आहे. पाऊसच  नसल्याने अर्धरब्बी पेरणी आता होणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.  एवढय़ात चागंला, दमदार पाऊस आल्यास रब्बी पेरणीला मात्र उ पयोगी पडू शकतो. त्यासाठी सर्वत्र पावसाची प्रतीक्षा आहे.  आता शे तकर्‍यांची सर्व भिस्त ही कापूस पिकावर आहे. ही पिके सध्या बर्‍या पैकी आहेत. पण, येत्या आठ ते दहा दिवसांत पावसाची नितांत गरज  आहे. पाऊस आल्यास बीटी कापसावर प्रतिकूल परिणाम होण्याची  शक्यता आहे. संरक्षित ओलितासाठी शेततळे, विहीरींमध्ये पाणीच  नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

सोयाबीन उत्पादनाने मोडला होता उच्चांकमागच्या वर्षी २0१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादनाने उच्चांक गाठला  होता. विदर्भात २५0.७२ लाख टन एवढे उत्पादन झाले, तर उत्पन्न  प्रतिहेक्टरी १४.४५ क्विंटल एवढे होते, त्या तुलनेत यावर्षी उत्पादन  सध्यातरी शून्य आहे.

पाऊस नसल्याने खरीप पिकांची स्थिती चिंताजनक असून, सोयाबीन  पिकांवर एकाचवेळी तीन प्रकारच्या किडींनी चाल केली आहे.  सर्वेक्षण सुरू  आहे; पण सोयाबीन पिकांचे उत्पादन प्रचंड घटण्याची  शक्यता आहे. - डॉ. मोहन खाकरे, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ, डॉ.पंदेकृवि, अकोला.-