दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना महान येथे गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह छापा घातला असता, महान गावात काही आरोपी गांजाची शेतीच करीत असल्याचे समोर आले. पोलिसांनी महान येथील सलीम खान जब्बार खान याच्या घरातून सात किलो गांजा जप्त केला. या गांजाची बाजारपेठेत ६० हजार रुपये किंमत आहे. पोलिसांनी महान येथील पेट्रोलपंपालगतच्या तस्लीम खान उर्फ एक्का खान असलम खान याच्या घरात छापा मारला. सलीम खान याच्या घराच्या परिसरात गांजाची शेती दिसून आली. शेतामध्ये गांजाची तब्बल १०० झाडे आढळून आले. पोलिसांनी त्याच्यातील शेतातील पाच किलो गांजाची झाडे जप्त केली. तसेच शेतातील गांजाची शेती उद्ध्वस्त केली. या गांजाची किंमत ७० हजार रुपये आहे. पोलिसांनी एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महान येथील सर्वात मोठे गांजाचे रॅकेट दहशतवादी विरोधी पथकाने उद्ध्वस्त केले. महान येथील सलीम खान व तस्लिम खान हे दोघे लाखो रुपयांचा दररोज लाखो रुपयांचा गांजा विकत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. तसेच महान येथे दहशतवादी पथकाने केलेल्या कारवाईत ३४८ दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून, त्याची किंमत दहा हजार रुपये आहे. आरोपी सलिम खान जब्बार खान व तस्लीम खान उर्फ एक्का खान याला अटक केली.
फोटो: