शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात प्रथमच आढळला ‘ग्रे हेडेड लॅपविंग’

By admin | Updated: May 9, 2016 02:18 IST

कुंभारीच्या तलावावर मुक्काम : ‘वेक्स’च्या पक्षी अभ्यासकांनी घेतली नोंद.

अकोला: पूवरेत्तर चीन आणि जपान येथे मूळ अधिवास असलेला ह्यग्रे हेडेड लॅपविंगह्ण अर्थात राखाडी डोक्याचा टिटवी हा दुर्मीळ पक्षी अकोला जिल्हय़ात प्रथमच आढळून आला. परतीच्या प्रवासादरम्यान हा पक्षी अकोला शहरानजीकच्या कुंभारी तलावावर काही दिवसांसाठी मुक्कामी थांबला आहे. 'वाइल्ड लाइफ अँन्ड इनव्हायर्नमेंट कन्झर्व्हेशन सोसायटी', अमरावती (वेक्स)च्या पक्षी अभ्यासकांनी गुरुवार, ५ डिसेंबर रोजी या पक्ष्याची नोंद घेतली असून, हा पक्षी जिल्हय़ात प्रथमच दिसून आल्याचा दावा ह्यवेक्सह्णचे पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार यांनी केला आहे.हिवाळय़ात अनेक देशांमधील विविध प्रजातीचे पक्षी भारतात स्थलांतर करतात. देशभरातील पाणवठय़ांवर विविध पक्षी आढळून येतात. हिवाळा संपला की विदेशी पक्षी परतीच्या प्रवासाला निघतात. मार्च महिन्यापर्यंत त्यांचा हा परतीचा प्रवास सुरू असतो. दक्षिण भारतात स्थलांतर करून गेलेले पक्षी एप्रिल व मे महिन्यात परतीच्या प्रवासात निघतात.या परतीच्या प्रवासादरम्यान ते विदर्भावरून जातात. यावेळी अकोला, अमरावती जिल्हय़ांमध्ये या पक्ष्यांना बघण्याची संधी पक्षी निरीक्षकांना मिळते. अमरावती येथील ह्यवेक्सह्णचे पक्षी अभ्यासक गत चार वर्षांपासून विदेशी पक्ष्यांच्या परतीचा अभ्यास करीत आहेत. ह्यवेक्सह्णचे अकोला येथील पक्षी अभ्यासक शिशिर शेंडोकार व मंगेश तायडे यांना कुंभारी तलावावर राखाडी डोक्याचा टिटवी पक्षी आढळून आला. या दोघांनी या दुर्मीळ पक्ष्याची छायाचित्रेही घेतली आहेत. भारतात आढळणार्‍या टिटवी या पक्ष्याच्या प्रजातीचा असलेला हा ग्रे हेडेड लॅपविंग अत्यंत रुबाबदार पक्षी आहे. त्याचा मानेपासून डोक्यापर्यंतचा रंग राखाडी असतो. चोच व पाय पिवळेधम्म असून, चोच काळी असते. छातीवर काळय़ा रंगाचा कॉलरसारखा पट्टा असून, पुढे शेपटीपर्यंत पोटाखालचा भाग पांढरा असतो. पंखांचा रंग गर्द तपकिरी असून, शेपटीचे टोक काळे असते. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव व्हेनेलस सिनेरिअस असे आहे.विदर्भात पहिली नोंद भंडार्‍यातहा पक्षी विदर्भात पहिल्यांदा भंडारा जिल्हय़ातील झिलमिली तलावावर २0१0 मध्ये आढळला होता. त्यानंतर अमरावती जिल्हय़ात २0१२ मध्ये या पक्ष्याची नोंद घेतल्या गेली. २0१५ मध्ये वर्धा जिल्हय़ातही तो आढळला होता. अकोला जिल्हय़ातही प्रथमच नोंद असल्याचे ह्यवेक्सह्णचे सचिव तथा मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले.