शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्लिचिंग पावडर’ च्या वापरात ग्रामपंचायतींची कुचराई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 01:13 IST

३६ गावे ब्लिचिंग पावडरविना : ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात.

संतोष येलकर अकोला, दि. 0९: जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जुलै अखेर जिल्ह्यात ३६ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरविनाच पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, पाणी पुरवठय़ात नियमित व गुणवत्तापूर्ण ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याच्या कामात संबंधित ग्रामपंचायतींकडून कुचराई होत असल्याची बाब समोर येत आहे.गावात स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठय़ात नियमित व गुणवत्तापूर्ण ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. गत जुलैमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आरोग्य कर्मचार्‍यांनी गृहभेटीद्वारे केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील सातपैकी चार तालुक्यात २५ ग्रामपंचायती अंतर्गत ३६ गावांमध्ये पाणीपुरवठय़ात ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यासाठी ब्लिचिंग पावडरच उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी नियमित ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात येतात; मात्र वारंवार निर्देश देऊनही ग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत नसल्याने, पाणी पुरवठय़ात ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याच्या कामात संबंधित ग्रामपंचायतींकडून कुचराई करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.