शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

२३ हजार शेतक-यांना अनुदान!

By admin | Updated: March 15, 2017 02:48 IST

पणन संचालकांकडे आठ कोटींची मागणी; सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या याद्यांची छाननी

संतोष येलकर अकोला, दि. १४- सोयाबीन विकलेल्या जिल्हय़ातील २२ हजार ९८२ शेतकर्‍यांना प्रति क्विंटल २00 रुपयेप्रमाणे लवकरच अनुदान मिळणार आहे. त्यासाठी जिल्हय़ातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून प्राप्त सोयाबीन विकलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांची छाननी करण्यात येत असून, पात्र सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान वाटपासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत ७ कोटी ७0 लाख ९४ हजार रुपयांच्या अनुदानाची मागणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत मंगळवारी राज्याच्या पणन संचालकांकडे करण्यात आली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी सोयाबीन विकलेल्या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २00 रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत गत २0 जानेवारी रोजी घेण्यात आला. त्यानुषंगाने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २00 रुपये अनुदान वाटप करण्यासाठी जिल्हय़ातील सोयाबीन विकलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्हय़ातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून मागविण्यात आल्या होत्या. जिल्हय़ातील सातही कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून प्राप्त झालेल्या सोयाबीन विकलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांची तालुकास्तरीय समित्यांकडून तपासणी करण्यात आली. त्यानुसार जिल्हय़ात सोयाबीन विकलेल्या २२ हजार ९८२ शेतकर्‍यांना अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. तालुकास्तरीय समित्यांकडून पात्र ठरविण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांची छाननी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत करण्यात येत असून, अनुदानासाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील सोयाबीन विकलेल्या शेतकर्‍यांना अनुदान वाटप करण्यासाठी ७ कोटी ७0 लाख ९४ हजार १४८ रुपयांच्या अनुदानाची मागणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत राज्याच्या पणन संचालकांकडे करण्यात आली आहे. याद्यांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हय़ातील सोयाबीन विकलेल्या शेतकर्‍यांसाठी लवकरच अनुदान प्राप्त होणार आहे. जिल्हय़ातील सोयाबीन विकलेल्या शेतकर्‍यांना अनुदान वाटपासाठी तालुकास्तरीय समित्यांकडून प्राप्त झालेल्या पात्र शेतकर्‍यांच्या याद्यांची छाननी करण्याचे काम सुरू आहे. छाननीनंतर अनुदानासाठी पात्र शेतकर्‍यांच्या याद्या ह्यऑनलाइनह्ण पणन संचालकांकडे सादर करण्यात येतील. त्यानंतर सोयाबीन अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.- जी.जी. मावळेजिल्हा उपनिबंधक

शेतकर्‍यांनी विकले ३ लाख ८५ हजार क्विंटल सोयाबीन!जिल्हय़ातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या सातही कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून प्राप्त अहवालानुसार सातही बाजार समित्यांतर्गत २२ हजार ९८२ शेतकर्‍यांनी ३ लाख ८५ हजार ४७0 क्विंटल बियाणे विकले.