शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथ दिंडीने झाली राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाची नांदी

By atul.jaiswal | Updated: November 5, 2022 11:07 IST

शनिवारी (५ नोव्हेंबर) रोजी सकाळी राष्ट्रगौरव दिंडी ग्रंथ दिंडी काढण्यात येऊन या साहित्य संमेलनाची थाटात सुरुवात झाली.

स्व.बाजीराव पाटील साहित्यनगरी (अकोला) :  विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाद्वारा दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन येथील स्व.बाजीराव पाटील साहित्यनगरी, प्रभात स्कूलच्या प्रांगणात होत आहे. 

शनिवारी (५ नोव्हेंबर) रोजी सकाळी राष्ट्रगौरव दिंडी ग्रंथ दिंडी काढण्यात येऊन या साहित्य संमेलनाची थाटात सुरुवात झाली. ग्रंथ दिंडीत भारतीय संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. साहित्यिक प्रदीप दाते यांच्या हस्ते ग्रंथ दिंडी, साहित्य दालन, प्रकाशन मंच, कवी कट्टा, गझल कट्टा व वऱ्हाडी कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी प्रमुख सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप, युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या दोन दिवसीय युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अरविंद जगतापभूषविणार आहेत, तर नाशिक येथील युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, प्रमुख उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्त अमरावती आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप पांढरपट्टे, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर व स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे असणार आहेत. या साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे मुख्य कार्यवाह डॉ.गजानन नारे, समन्वयक सीमा शेटे व विदर्भ साहित्य संघ आणि सहयोगी संस्थांद्वारा करण्यात आले आहे. ‘युवापिढी सध्या काय वाचतेय?’दुपारी १ वाजता ‘युवापिढी सध्या काय वाचतेय?’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संतोष अरसोड (यवतमाळ), नितीन नायगावकर (नागपूर), चंद्रकांत झटाले (अकोला), ॲड.कोमल हरणे (अकोला), मैत्री नरेंद्र लांजेवार (बुलडाणा) यांचा सहभाग असणार आहे, तर परिसंवादाचे अध्यक्षपद ऐश्वर्य पाटेकर भूषविणार आहेत. त्यानंतर, निमंत्रितांचे काव्यसंमेलन रंगणार असून, विदर्भासह महाराष्ट्रातून आलेले निमंत्रित कवी त्यांचे काव्य सादर करणार आहेत. कविसंमेलनाचे अध्यक्षपद डॉ.विशाल इंगोले भूषविणार आहेत, तर बहारदार सूत्रसंचालन किशोर बळी करणार आहेत.

टॅग्स :Akolaअकोला