शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून निराधार, श्रावण बाळ योजनेचे अनुदान थकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:23 IST

संतोषकुमार गवई पातूर : गेल्या दोन महिन्यांपासून संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना अनुदान थकल्याने वृद्ध, गोरगरीब वंचित ...

संतोषकुमार गवई

पातूर : गेल्या दोन महिन्यांपासून संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना अनुदान थकल्याने वृद्ध, गोरगरीब वंचित लाभार्थी संकटात सापडले आहेत. तालुक्यातील श्रावण बाळ योजनेतील ५०९९ व संजय गांधी निराधार योजनेतील २६५६ लाभार्थी आहेत. वयोवृद्ध निराधार, गोरगरीब, विधवा, परित्यक्ता, अपंग लाभार्थींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळणारे अनुदान अद्यापही प्राप्त झाले नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. श्रावण बाळ योजनेतील पाच हजार ९९ लाभार्थ्यांपैकी अनुसूचित जाती-जमातींचे लाभार्थी वगळता उर्वरित तीन हजार ८५५ लाभार्थींचे अनुदान अद्यापही शासनाकडून प्राप्त झाले नाही, तसेच लाभार्थींना वाटप करण्यात आलेले नाही. संजय गांधी निराधार योजनेतील दोन हजार ६५६ लाभार्थ्यांपैकी अनुसूचित जातीच्या ४३३ लाभार्थ्यांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. गेल्या दीड वर्षापासून शासनस्तरावरून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे अनुदान अनियमित स्वरूपाचे मिळत असल्यामुळे जगावे की मरावे, अशी व्यथा गरजू लाभार्थींची झाली आहे. तालुक्यात जवळपास आठ हजार लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत. लाभार्थी पातूर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गरजू आणि गरीब नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.

-------------------

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे जुलै महिन्याचे शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे. ऑगस्ट महिन्याचे अनुदान शासनाकडून मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

-जी. एम. डाहोरे, नायब तहसीलदार, पातूर