शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा सेवा संघाची भव्य शोभायात्रा

By admin | Updated: December 25, 2015 03:14 IST

अजित पवार यांनी दाखवली हिरवी झेंडी.

अकोला: मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनानिमित्त अकोला क्रिकेट क्लब मैदानावर २४ ते २६ डिसेंबरदरम्यान वैचारिक दालनाच्या माध्यमातून समाजाच्या जडणघडणीवर प्रकाशझोत टाकला जाणार असून, गुरुवारी यानिमित्त शोभायात्राही काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शोभायात्रेला हिरवी झेंडी दाखवली. मराठा सेवा संघाच्या तीन दिवसीय अधिवेशनाला गुरुवारी शोभायात्रेने सुरुवात करण्यात आली. रामदासपेठ येथील होमगार्ड ग्राउंडवर मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली होती. मिरवणुकीत जिल्ह्याच्या विविध भागातून सहभागी झालेले महिला भजनी मंडळ, माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारलेला अश्‍वरथ, तसेच बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, ठाणे यांसह हरियाणा येथून दाखल झालेल्या शिवप्रेमींना दुर्गा चौकामध्ये शिस्तीत उभे करण्यात आले. या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोभायात्रेला हिरवी झेंडी दाखविली. तत्पूर्वी अजित पवार यांचे माजी आमदार रेखाताई खेडेकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी राकाँचे ज्येष्ठ नेते वसंतराव धोत्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, राकाँ जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, शहर अध्यक्ष अजय तापडिया, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, रवींद्र सपकाळ, मार्तंडराव माळी, देवानंद ताले आदींसह असंख्य शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.