शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पीक कापणी प्रयोगावर ग्रामसेवकांचा राज्यभरात बहिष्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 18:08 IST

अकोला : ग्रामसेवक संवर्गाकडे आधीच प्रचंड कामे दिली असताना कृषी विभागाचे तांत्रिक काम असलेले पीक कापणी प्रयोगही ग्रामसेवकांना करण्याची सक्ती केली जात आहे. यापुढे ग्रामसेवक पीक कापणी प्रयोगाचे काम करणार नाहीत.

ठळक मुद्देत्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय राज्य ग्रामसेवक युनियनने घेतला आहे. त्यामुळे या कामाची सक्ती करू नये, असे पत्र ग्रामसेवक युनियनने प्रधान सचिवांना दिले आहे.

अकोला : ग्रामसेवक संवर्गाकडे आधीच प्रचंड कामे दिली असताना कृषी विभागाचे तांत्रिक काम असलेले पीक कापणी प्रयोगही ग्रामसेवकांना करण्याची सक्ती केली जात आहे. यापुढे ग्रामसेवक पीक कापणी प्रयोगाचे काम करणार नाहीत. त्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय राज्य ग्रामसेवक युनियनने घेतला आहे. त्यामुळे या कामाची सक्ती करू नये, असे पत्र ग्रामसेवक युनियनने प्रधान सचिवांना दिले आहे.शासनाच्या कृषी विभागाकडे तांत्रिक ज्ञान असलेले मनुष्यबळ आहे. त्यामुळे कृषी विभाग आणि विमा कंपनीने संयुक्तपणे पीक कापणी प्रयोग करून पैसेवारी महसूल विभागाने ठरवावी, या पद्धतीने ते झाल्यास तांत्रिकदृष्ट्या बीनचूक होईल, तसेच भविष्यात शेतकरी व प्रशासनामध्ये संघर्ष होणार नाही. त्यातच ग्रामसेवकांची सेवा प्रवेश अर्हता १२ वी उत्तीर्ण असल्याने त्यांना कृषीविषयक कोणतेही पायाभूत शिक्षण नसते. ज्यांना कामाचे ज्ञान नाही, त्यांच्याकडून कामाची अपेक्षा ठेवणे संयुक्तिक नाही. ग्रामसेवक संवर्गाकडे शेतीचे अभिलेख नसतात. त्यांना तलाठी माहिती देत नाहीत. त्यामुळे पीक कापणी प्रयोग करताना सात-बारा, पीक पेरा यामध्ये अनवधानाने चुका होऊ शकतात. तशा चुका झाल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याची तरतूद २५ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयात आहे. त्याचवेळी २४ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयातून पीक कापणी प्रयोगातून तलाठी संवर्गाला वगळण्यात आले. त्यांच्याऐवजी मंडळ अधिकाऱ्यांना ते काम सोपवले. विशेष म्हणजे, तलाठी संवर्गापेक्षा ग्रामसेवक संवर्गाला दुप्पट कामांचा व्याप आहे. तलाठ्याप्रमाणे ग्रामसेवकांनाही त्या कामातून वगळण्यात यावे, या कारणांमुळे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने २०१८ च्या खरीप हंगामापासून पीक कापणी प्रयोगाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यापुढे पीक कापणी प्रयोगाची कामे करणार नाहीत. त्यांना या कामासाठी सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी प्रधान सचिवांना निवेदनातून करण्यात आली आहे. त्यावर राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्या स्वाक्षरी आहेत. अकोला जिल्हाधिकाºयांना या बहिष्काराबाबत जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, सचिव महेंद्र बोचरे यांनी १३ आॅगस्ट रोजी पत्र दिले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला