शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कवठा येथे ग्रामसेवकावर हल्ला

By admin | Updated: January 10, 2017 02:33 IST

शौचालय असल्याचे बनावट प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने ग्रामसेवकावर हल्ला.

उरळ (अकोला), दि. ९- शौचालय असल्याचे बनावट प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने ग्रामसेवकावर हल्ला केल्याची घटना कवठा ग्रामपंचायतमध्ये ९ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कवठा येथील ग्रामसेवक शशिकांत श्रीधरराव इंगळे हे ९ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत होते. दरम्यान, तेथे गावातील सागर विजय घ्यारे हा युवक आला. त्याने ग्रामसेवक इंगळे यांना शौचालय नसताना असल्याचे प्रमाणपत्र मागितले. इंगळे यांनी नकार दिला असता घ्यारे याने ग्रामपंचायत कार्यालयात असलेला सौर ऊर्जा दिव्याच्या पाइपने त्यांच्यावर वार केला. इंगळे यांनी तो वार चुकवला. त्यानंतर घ्यारे याने इंगळेंना मारहाण केली तसेच अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शशिकांत इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी सागर घ्यारे विरुद्ध कलम ३५३, ३३२, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घ्यारे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात पोकॉ संतोष सोळंके व संतोष मेहंगे करीत आहेत.