शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

ग्रामगीता परीक्षेत पाच हजारांवर विद्यार्थी उत्तीर्ण

By admin | Updated: May 10, 2014 20:30 IST

ग्रामगीता युगप्रवर्तक ग्रंथाचा अभ्यास

अकोला : शालेय विद्यार्थ्यांना ग्रामगीता युगप्रवर्तक ग्रंथाचा अभ्यास व्हावा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समग्र वाङ्मय वाचण्यात यावे, विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावे, याकरिता आयोजित करण्यात आलेल्या ग्रामगीता जीवन विकास परीक्षेत ५३१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अंतर्गत १९९० पासून ग्रामगीता जीवन विकास परीक्षा रामटेके दादांच्या अध्यक्षतेखाली सहा विभागात घेण्यात येते. प्रथम प्रवेश परिचय, प्रवीण, ग्रामनाथ, ग्रामरत्न व ग्राम गीताचार्य या परीक्षा घेऊन पदवीदान केले जाते. आतापर्यंत जिल्ह्यात २०१० ते २०१४ चार वर्षांत ३६०५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अकोला जिल्हा श्री गुरुदेव सेवामंडळाचे जिल्हा सेवाधिकारी भानूदास कराळे यांनी शाळा- महाविद्यालयांना परीक्षेसाठी आवाहन केले होते. ८ जून रोजी आयोजित जिल्हा मेळाव्यात प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. यावर्षी नवीन सत्रात २९ विद्यार्थी ग्रामगीताचार्य परीक्षेला बसणार आहेत. श्री गुरुदेव सेवाश्रम या परीक्षा केंद्रातून प्रवीण गटातून डॉ. सु.अ. चेडे ७० गुण घेऊन प्रथम आले. ग्रामनाथ गटातून नीलिमा विजय मोडक ७१ गुण घेऊन प्रथम आल्या. ग्रामरत्न गटातून प्रभावती खरतळकर व ॲड. वंदन कोहाडे ७० गुण घेऊन प्रथम आले. ॲड. रामसिंह राजपूत याच्या हस्ते प्रमाणपत्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीराम गावंडे होते. २०१४-१५ च्या सत्रात सर्वांनी सहभागी होऊन परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन भानुदास कराळे, सुधाताई जंजाळ, डॉ. दिलीप कळमकर, प्रा. गायकवाड, रामराव पाटेखेडे, गोवर्धन खवले, जयंतराव इंगोले यांनी केले आहे.