शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा घोटाळा: पुन्हा आंधळी कोशिंबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात शेतकºयांच्या नावावर झालेल्या लाखो रुपयांच्या अनुदानित हरभरा बियाणे घोटाळ्यात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयादरम्यान पुन्हा आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू झाला आहे. राज्याच्या कृषी विभागाने कृषी केंद्र संचालकांवर कारवाईसाठी केवळ संदर्भपत्र आणि चौकशी अहवालाची प्रत देत कारवाई करण्याचे म्हटले, तर प्रकरणातील न्यायालयीन ...

ठळक मुद्देकायदेशीर पुराव्यासाठी अधीक्षक कार्यालयाला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात शेतकºयांच्या नावावर झालेल्या लाखो रुपयांच्या अनुदानित हरभरा बियाणे घोटाळ्यात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयादरम्यान पुन्हा आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू झाला आहे. राज्याच्या कृषी विभागाने कृषी केंद्र संचालकांवर कारवाईसाठी केवळ संदर्भपत्र आणि चौकशी अहवालाची प्रत देत कारवाई करण्याचे म्हटले, तर प्रकरणातील न्यायालयीन कंगोरे लक्षात घेता त्यासाठी पुराव्यासह माहिती देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केल्याची माहिती आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शासनाने शेतकºयांना अनुदानित दरावर हरभरा बियाणे उपलब्ध केले. ते बियाणे पात्र शेतकºयांना न मिळता काही कृषी सेवा केंद्र संचालकांनी बनावट नावाच्या शेतकºयांना वाटप केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात ते बियाणे धान्य रूपात काळ्याबाजारात विकण्यात आले. त्यातून शासनाच्या लाखो रुपयांच्या अनुदानाला चुना लावण्यासोबतच काळ्याबाजारातील अधिक दराचा मलिदा कृषी केंद्र संचालकांनी लाटला.विभागीय कृषी सहसंचालकांच्या पथकाने केलेल्या चौकशीत २११ कृषी केंद्रांत हा घोटाळा कमी-अधिक प्रमाणात झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कृषी केंद्रांवर पुढील कारवाई करण्याचे पत्र अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने ५ जुलै रोजीच जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी एच.जी. ममदे यांना पाठविले. त्या पत्रानुसार २० दिवसांनंतरही कुठलीच कारवाई का झाली नाही, याबाबत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला.याबाबत अधिक माहिती घेतली असता राज्याच्या कृषी विभागाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला केवळ पत्र आणि चौकशी अहवाल दिला. त्यावरून कृषी केंद्र संचालकांच्या परवान्यावर कारवाई करणे घिसाडघाईचे ठरेल, असा पवित्रा कृषी विकास अधिकारी ममदे यांनी घेतला.त्यामुळे पुढील कारवाई करण्यासाठी चौकशीतील संपूर्ण कागदपत्रे देण्याची मागणी त्यांनी कृषी विभागाकडे केली आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकरणात या दोन विभागाकडून आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू होण्याचे चित्र आहे.