शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात ग्रामसभा वर्षभरापासून लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : राज्यात कोरोनाची लाट येताच ग्रामपंचायतींनी ग्रामसभा स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश १२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : राज्यात कोरोनाची लाट येताच ग्रामपंचायतींनी ग्रामसभा स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश १२ मे २०२० रोजी ग्रामविकास विभागाने काढले होते. सध्या कोरोनाचा कहर वाढतच असल्याने अद्यापही ग्रामसभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. परिणामी, जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा गत वर्षभरापासून न झाल्याने गावाच्या विकासाचा वेग मंदावला आहे. अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची निवड खोळंबली आहे, तर आराखडा मंजूर होऊन लांबणीवर पडला आहे.

शासन निर्णयानुसार १ मे रोजीच्या ग्रामसभेत प्रशासनाकडून अहवाल वाचन होते. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड केली जाते. ही ग्रामसभा होऊ न शकल्याने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेचे लाभार्थी निवडता आलेले नाही. रोजगार हमीचा आराखडा मासिक बैठकीत १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत मंजूर केला जातो; पण ही ग्रामसभा झालीच नाही. योजनेतून गावात कोठे - कोठे विकास कामे करायची यावर चर्चा होऊ शकली नाही. पंचायत समितीकडे हा आराखडा सादर करावयाचा असल्याने सदस्यांच्या मासिक बैठकीत तो मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीत विरोधात असलेल्या सदस्यांच्या प्रभागातील कामे डावलण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित ग्रामसभेत १५ व्या वित्त आयोगाचा सुधारित आराखडा मंजूर केला जातो. हा आराखडा मंजूर करताना ग्रामसभेत सखोल चर्चा होते. विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून सुधारित आराखडा मंजूर केला जातो; परंतु ही ग्रामसभासुद्धा होऊ शकली नाही. त्यानंतर २६ जानेवारीची ग्रामसभा होईल, असे वाटले होते. मात्र, तीही रखडली. सध्या कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. जिल्ह्यात आठशेच्या वर दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. शासनाने ग्रामसभाबाबत कोणतेच आदेश काढले नाहीत. मार्च महिनाही त्यातच गेला. शासकीय आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरू झालेले आहे. यामुळे गेले वर्षभर एकही ग्रामसभा झालीच नाही. याचा परिणाम विकासकामावर झाला आहे.

असा आहे शासन निर्णय

आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे; परंतु कोरोना साथीमुळे आर्थिक वर्ष संपत आले तरी एकही ग्रामसभा होऊ शकल्या नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांना खीळ बसली आहे. लाभार्थी निवड खोळंबली आहेत.