शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गावठाण मोजणीसाठी ग्रामपंचायतींना द्यावा लागणार निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:50 IST

अकोला: गावठाणचे भूमापन करून मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी राज्यात होणाऱ्या खर्चापोटी २९८ कोटींपैकी राज्याचा हिस्सा म्हणून दोन कोटी रुपये निधी ग्रामविकास विभागाने जमाबंदी आयुक्तांना दिला आहे.

अकोला: गावठाणचे भूमापन करून मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी राज्यात होणाऱ्या खर्चापोटी २९८ कोटींपैकी राज्याचा हिस्सा म्हणून दोन कोटी रुपये निधी ग्रामविकास विभागाने जमाबंदी आयुक्तांना दिला आहे. त्यासाठी पुढे लागणाऱ्या खर्चासाठी आता ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातून निधी द्यावा लागणार आहे. त्या निधीची कपात लवकरच होण्याची शक्यता आहे. ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त, भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या सहभागाने ही योजना राबविण्याचा निर्णय शासनाने २२ फेब्रुवारी रोजी घेतला आहे.गावांची वाढती लोकसंख्या, विकासाच्या विविध योजनांमुळे गावात मोठ्या प्रमाणात भौगोलिक बदल होत आहेत. परिणामी जमीन, जागा हस्तांतरणाची प्रक्रियाही वेगात होत आहे; मात्र गावात गावठाणाचे अभिलेख नसल्यामुळे कोणाच्या मालकीची नेमकी किती जागा आहे, ही बाब सुस्पष्ट नाही. बांधकाम परवाना देण्याासाठी जागेचा नकाशा व गावठाणाचे भूमापन आवश्यक आहे. त्यातच जागेचे मालमत्ता पत्रक नसल्याने बँकांमध्ये आर्थिक पतही निर्माण झालेली नाही. त्याशिवाय, ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मालमत्ता कर वसुलीमध्ये सुधारणा करण्याचीही तरतूद होणार आहे. ग्रामस्थांची गैरसोय दूर करणे, ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न या योजनेतून होणार आहे.- मिळकत पत्रिकेची अधिकार अभिलेखात नोंदयोजना राबविण्याच्या पहिल्या पद्धतीत गावठाण भूमापन करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करणे, दुसºया पद्धतीत गावातील मालमत्तेचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार केले जाईल. त्यापोटी राज्यभरात २९८ कोटी खर्च तर भारतीय सर्वेक्षण विभागाला ७६ कोटी दिले जाणार आहेत.- शासन व ग्रामपंचायतींची जमीनही निश्चित होणार!गावठाणातील मालमत्तांचे रेखांकन व मूल्यांकन करणे, प्रत्येक घराचा नकाशा तयार करणे, खुली जागा, रस्त्यांचे नकाशे तयार करणे, प्रत्येक घर, रस्ता, गल्ली, नाला यांना नगर भूमापन क्रमांक देणे, प्रत्येक मिळकतीची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार पत्रिका तयार करून वाटप करणे, ग्रामपंचायतीच्या व शासनाच्या जागा तसेच इमारतींची नोंदवही तयार केली जाणार आहे.- ग्रामपंचायतींकडून द्यावा लागणार निधी!योजनेसाठी लागणारा निधी ग्रामपंचायतींना प्राप्त होणाºया उत्पन्नाच्या स्रोतांतून तसेच केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त होणाºया अनुदानातून खर्च केला जाणार आहे. त्यासाठी प्रतिमिळकत पत्रिका किमान ५०० रुपये खर्च होणार आहे. ग्रामपंचायतला मिळणाºया विविध प्रकारच्या निधीतून तो जिल्हा परिषदेला द्यावा लागणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत