शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ सावटात अडकली ग्रामपंचायतची दप्तर तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 10:23 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या सावटात विभागातील पाचही जिल्ह्यांत ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी अडकली आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणारी ग्रामपंचातींची अभिलेखे (दप्तर) तपासणीची मोहीम स्थगित करून, १ डिसेंबरपासून ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी सुरू करण्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी विभागातील पाचही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) २५ आॅगस्ट रोजी दिला. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाच्या सावटात विभागातील पाचही जिल्ह्यांत ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी अडकली आहे.ग्रामपंचायत स्तरावर असलेली सर्व प्रकारची अभिलेखे अद्ययावत नसल्यामुळे संबंधित माहितीच्या दृष्टीने प्रशासनाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतींची अभिलेखे (दप्तर) अद्ययावत करण्यासाठी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांतीलग्रामपंचायतींच्या गत पाच वर्षातील दप्तर तपासणी १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत करण्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी १० आॅगस्ट रोजी विभागातील पाचही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी सुरू करण्याचा आदेश पंचायत समितींच्या गटविकास अधिकाºयांना देण्यात आला होता. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामात राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी व्यस्त असून, अनेक ग्रामसेवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीस तूर्त स्थगिती देण्याची मागणी महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनकडून विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार विभागातील पाचही जिल्ह्यात १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणारी ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीची मोहीम स्थगित करून, १ डिसेंबरपासून ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीची मोहीम राबविण्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी विभागातील पाचही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना २५ आॅगस्ट रोजी दिला. त्यामुळे कारोना संकटाच्या काळात विभागातील पाचही जिल्ह्यात ग्रामपंचायतींची दप्तर तपासणीही लांबणीवर पडली आहे.३० नोव्हेंबरपर्यंत अभिलेखे अद्ययावत करण्याचे निर्देश!१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ग्रामपंचायतींची गत पाच वर्षांतील सर्व अभिलेखे (दप्तर)अद्ययावत करून, त्यानंतर १ डिसेंबरपासून ग्रामपंचायतींची दप्तर तपासणीची मोहीम सुरू करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी विभागातील पाचही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या