शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्यांना पहिल्यांदाच दिले जाणार प्रमाणपत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:40 IST

जिल्हा परिषद सदस्यांप्रमाणेच राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून येणार्‍या सदस्यांना पहिल्यांदाच निवडून आल्याचे संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी गुरुवारी येथे दिली.

ठळक मुद्देराज्य निवडणूक आयुक्तांची माहितीअवैध ठरणार्‍या अर्जांचे प्रमाण कमी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद सदस्यांप्रमाणेच राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून येणार्‍या सदस्यांना पहिल्यांदाच निवडून आल्याचे संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी गुरुवारी येथे दिली.ग्रामपंचायत निवडणुकांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी अकोला दौर्‍यावर आले असता, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरपंच पदांसाठी थेट जनतेतून निवडणूक घेण्यात येत असल्याने, ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांमध्ये मतदारांना एक मतदान अधिक करावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांसाठी खर्चाची र्मयादा निश्‍चित करण्यात आली असून, मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर मतपित्रका लावण्यात येणार आहेत. त्यासाठी मतपित्रकांचे रंग निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सरपंच पदांसाठी फिका निळा रंगाची मतपत्रिका राहणार आहे, तर सदस्य पदांसाठी एससी प्रवर्गाकरिता -फिका गुलाबी, एसटी प्रवर्गासाठी -फिका हिरवा, ओबीसी प्रवर्गासाठी -पिवळा आणि सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या मतपित्रकांचा रंग पांढरा राहणार आहे, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.येत्या डिसेंबरपर्यंत पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या अकोला जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३0 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावा लागेल. ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करावी लागणार आहे, असेही राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपजिल्हाधिकारी (ग्रामपंचायत निवडणूक) अभयसिंह मोहिते उपस्थित होते.

अवैध ठरणार्‍या अर्जांचे प्रमाण कमी!ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यात येत असल्याने, उमेदवारी अर्ज अवैध ठरण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी यावेळी स्पष्ट केले.५0 टक्के जागा आरक्षित; महिला पुढे येतील!ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५0 टक्के जागा आरक्षित आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणात पुढे येतील, असा विश्‍वास राज्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केला. 

जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागात आचारसंहिता!अकोला जिल्ह्यात एकूण ५३0 ग्रामपंचायतींपैकी २७२ ग्रामपंचायतींच्या म्हणजेच ५0 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने, निवडणुकांची आचारसंहिता जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागात लागू करण्यात आली आहे. परंतु, जेथे निवडणूक नाही, तेथे विकास कामांवर आचारसंहितचे कोणतेही बंधन नसल्याचेही राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.