शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धान्य दुकानदारांना माफिया, पोलिसांचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:43 IST

तेल्हारा शहरातील शासकीय गोदामातून गावाकडे जाणारी धान्याची वाहने पोलिसांनी अडवून दुकानदारांना पैशांची मागणी करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले. या सततच्या त्रासाला कंटाळून तेल्हारा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यामध्ये वाहने अडविणारा पोलीस अधिकारी आणि धीरज चहाजगुणे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

ठळक मुद्देसततच्या त्रासाला कंटाळून दुकानदारांची ‘एसपीं’कडे धावजिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे ‘एसपीं’ना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तेल्हारा शहरातील शासकीय गोदामातून गावाकडे जाणारी धान्याची वाहने पोलिसांनी अडवून दुकानदारांना पैशांची मागणी करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले. या सततच्या त्रासाला कंटाळून तेल्हारा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यामध्ये वाहने अडविणारा पोलीस अधिकारी आणि धीरज चहाजगुणे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.तेल्हारा तालुक्यातील दुकानदारांची धान्याची उचल सुरू असताना त्यांची वाहने अडविण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले होते. त्यामध्ये बेलखेड येथील रमेश वसे, हिवरखेड येथील प्रकाश खोब्रागडे यांची वाहने अडविण्यात आली. या प्रकारांची माहिती दुकानदार संघटनेने निवेदनात दिली. त्यामध्ये ५ ऑगस्ट रोजी शासकीय गोदामातून हिवरखेड येथील दुकानाचे धान्य घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरसमोर गाडी लावून धीरज चहाजगुणे या व्यक्तीने अडविला. त्याचवेळी पोलिसांना फोन केला. ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष केदासे घटनास्थळावर हजर झाले. त्यांनी विचारणा केल्यावर दुकानदाराने त्यांना धान्याचे परमिट व गोदामाची गेटपास दाखविली. परमिटनुसार शासकीय धान्य असताना केदासे यांनी ट्रॅक्टर ठाण्यात लावला. त्याचवेळी धीरज चहाजगुणे याच्यामार्फत पैशांची मागणी केली. दुकानदाराने नकार दिल्यामुळे केदासे यांनी चिडून ट्रॅक्टरमधील धान्याचे वजन मोजण्यासाठी तब्बल दोन वेळा काट्यावर पाठविला. धान्याचे वजन बरोबर असतानाही सायंकाळी ५ वाजेपर्यंत ट्रॅक्टर सोडला नाही, त्यामुळे दुकानदार धास्तावले. धीरज चहाजगुणे आणि पोलिसांच्या या सततच्या त्रासाला दुकानदार कंटाळले. तेल्हारा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार खारोडे, भोजराज पालिवाल, राजपालसिंह ठाकूर, प्रकाश वाकोडे, जगन्नाथ दुतोंडे, शिवहरी मिरगे, दिनेश यादगिरे, प्रकाश खोब्रागडे यांनी त्या प्रकाराबद्दल जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे निवेदन सादर केले. पोलीस आणि चहाजगुणे यांच्या त्रासापासून वाचविण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली. 

जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे ‘एसपीं’ना पत्रशासकीय धान्य वाहतुकीदरम्यान संबंधित दुकानदाराने परमिट आणि गेटपास दाखविली. त्यानंतर समाधान न झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक संतोष मंदासे यांनी धान्याचे दोनदा वजन करण्यासाठी पाठविले. सर्व माहिती बरोबर असतानाही सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहन पोलीस ठाण्यात ठेवले. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे पत्र जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना १५ सप्टेंबर रोजी पाठविले आहे. 

तांदळाचा ट्रक गायब करणारा माफिया मोकाटजानेवारी २0१५ मध्ये तेल्हारा तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी असलेला दोनशे क्विंटल तांदळाचा ट्रक खुल्या बाजारात विकणारा रेशन माफिया कोण आहे, याची माहिती पोलिसांना आहे. त्या माफियांवर कारवाई न करणारे पोलीस दुकानदारांना नियमानुसार धान्य वाहतुकीसाठी त्रास देत आहेत. वरिष्ठांनी त्या माफियाची माहिती घेऊन त्याच्यासह पोलिसांवर कारवाई न केल्यास असे प्रकार यापुढेही सुरूच राहण्याची शक्यता आहे.