शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

पुरवठा यंत्रणेच्या वरदहस्तानेच धान्याचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 15:14 IST

यंत्रणेच्या वरदहस्तानेच राज्यभरात ५८ लाख क्विंटलपेक्षाही अधिक धान्याचे आॅफलाइन वाटप करून ते काळाबाजारात जाण्याचा रस्ता मोकळा करून देण्याचा प्रकार घडला आहे.

 - सदानंद सिरसाटअकोला: आॅनलाइन धान्य वाटपाला फाटा देत राज्यभरात आॅफलाइन वाटपाचा धडाका एप्रिल ते डिसेंबर २०१८ या काळात सतत सुरू होता. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे निर्देश, मंत्र्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतल्यानंतरही आॅफलाइन वाटप बंद करण्यात पुरवठा विभागाच्या रूट आॅफिसर, पुरवठा निरीक्षक, अन्नधान्य वितरण अधिकारी, निरीक्षण अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्वारस्य दाखवले नाही. यंत्रणेच्या वरदहस्तानेच राज्यभरात ५८ लाख क्विंटलपेक्षाही अधिक धान्याचे आॅफलाइन वाटप करून ते काळाबाजारात जाण्याचा रस्ता मोकळा करून देण्याचा प्रकार घडला आहे.धान्य वाटपासाठी एप्रिल २०१८ पासून आॅनलाइन प्रणाली सुरू झाली. त्या प्रणालीत आधार लिंक होऊनही पॉस मशीनद्वारे लाभार्थींची पडताळणी अशक्य आहे, त्यांना आॅफलाइन पद्धतीने धान्य वाटपाची मुभा देण्यात आली. पॉस मशीनद्वारे पडताळणी न होणारे लाभार्थी धान्य घेण्यासाठी येतच नाहीत. त्यांच्या लाभाचे धान्य दुकानदारांकडे शिल्लक राहते. दुकानदारांकडून संबंधित लाभार्थींच्या ‘नॉमिनी’ला धान्य वाटप केल्याची नोंद झाली. धान्य घेऊन जाणारे लाभार्थी अस्तित्त्वात आहेत की नाही, याची घरोघर भेटी देऊन पडताळणी करण्याचा आदेश पुरवठा विभागाने जून २०१८ पासून दिला. त्या पडताळणीला पुरवठा विभागाच्या यंत्रणेने सातत्याने फाटा दिला. त्यानंतर १८ व १९ सप्टेंबर २०१८ या दोन दिवसात धडक तपासणी मोहीम राबवण्याचेही निर्देश देण्यात आले. ती मोहीमही गुंडाळण्यात आली. त्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मे ते सप्टेंबर २०१८ या काळातील आॅफलाइन धान्य वाटपाची संपूर्ण माहिती १७ आॅक्टोबर २०१८ रोजी सादर करण्याचे पुरवठा विभागाला बजावले होते. त्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावाही त्यांनी घेतला होता. त्यानंतरही पुरवठा यंत्रणेच्या आॅफलाइन वाटपाच्या प्रमाणात कोणताही फरक पडला नसल्याचे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अहवालातून पुढे आले.- संगनमताने कोट्यवधीचा भ्रष्टाचारआॅफलाइन धान्य काळाबाजार नेण्यासाठी दुकानदारांना संधी देण्यामध्ये रूट आॅफिसरपासून ते पुरवठा निरीक्षक, अधिकाऱ्यांपर्यंत संगनमताने हा प्रकार घडला आहे. त्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी लाभार्थींची घरभेटीतून चौकशी आवश्यक आहे. त्यातून राज्यातील लाखो क्विंटल धान्याचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड होऊ शकतो.- आॅक्टोबर २०१८ नंतरचे राज्यात आॅफलाइन वाटपमहिना               धान्य (क्विंटल)आॅक्टोबर      ३,५५,३९०नोव्हेंबर            ३,३४,२९०डिसेंबर              २,८४,८४०

 

टॅग्स :Akolaअकोला