शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'पणन' च्या कापूस खरेदी केंद्रावर कृषी विभागाचे ग्रेडर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 16:42 IST

पणन महासंघाकडे 141 कर्मचारी असून त्यात ग्रेडरची संख्या ही 67 आहे

अकोला : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या मागणीनुसार शासनाने कृषी विभागाचे कर्मचारी दिले असून ,हे कर्मचारी कापसाची ग्रेडिंग करणार आहेत.त्यामुळे कापूस खरेदी  वाढेल असा विश्वास पणन महासंघाला आहे .1972 पासून राज्यात अधिकार कापूस खरेदी योजना राबवण्यात येत होती .त्यामुळे राज्य 400 ते 450 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत होती .शेतकऱ्यांच्या करता शासनाने ही योजना 2001 पर्यंत राबविली.मात्र 2002 -2003 पासून भारतीय कापूस महामंडळ ,सहकारी सूत गिरण्या आणि व्यापाऱ्यांना कापूस खरेदीची परवानगी देण्यात आली .त्यानंतर राज्य शासनाने कापूस एकाधिकार योजनेवर आर्थिक भार पडू नये म्हणून पणन महासंघाच्या कर्मचाºयांना २००४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगितले .तसेच दरवर्षी दरवर्षी पणन महासंघाचा वयोमानानुसार कमी होणारा कर्मचारीवर्ग कमी होत गेला त्यामुळे महासंघाकडे मनुष्यबळाची अत्यंत कमतरता आहे आजमितीस पणन महासंघाकडे 141 कर्मचारी असून त्यात ग्रेडरची संख्या ही 67 आहे2019 -20 पासून भारतीय कापूस महामंडळाचा उप अभिकर्ता म्हणून पणन महासंघ राज्यात कापूस खरेदी करत असून जवळपास 74 टक्के खरेदी केंद्र केली आहे तसेच 121 जिनिंग प्रेसिंग मधून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत यावर्षी पणन महासंघाने जवळपास 57 क्विंटल कापूस खरेदी केला आहे परंतु कर्मचाºयांची कमतरता भासत असल्याने पणन महासंघाकडे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत .राज्यातील शेतकºयांकडे ३५ ते ४० टक्के कापूस पडून आहे. खासगी बाजारात कापसाचे दर ४ हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत त्यामुळे शेतकरÞयांचा कल पणन महासंघाकडे आहे.परंतु पणन महासंघाकडे मनुष्यबाळाची कमतरता आहे.तसेच कापूस खरेदी केंद्र वाढविण्यासाठी पणन महासंघावर दबाव वाढत आहे. या पृष्ठ भूमीवर पणनमहासंघाने कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून कृषी विभागाचे कर्मचारी पणन महासंघाला देण्यात यावी अशी मागणी केली होती .याला अनुसरून कृषिमंत्र्यांनी पणन महासंघाला कर्मचारी दिले असून ,या कर्मचाºयांना पणन महासंघाच्या वतीने कापूस ग्रेडिंगच प्रशिक्षण देण्यात येत आहेपणन महासंघाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे.दुसरीकडे कापूस खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी होत आहे म्हणूनच कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून कृषी विभागाचे कर्मचारी देण्याची मागणी केली होती .पूर्ण झाली असून लवकरच विभागाचे कर्मचारी काम सुरू करणार आहेत.-अनंतराव देशमुख ,अध्यक्ष ,पणन महासंघ ,मुंबई .

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस