शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडीवर ‘जीपीएस’ प्रणाली

By admin | Updated: April 21, 2017 02:02 IST

मनपाकडे पाच निविदा प्राप्त: उद्या उघडणार

अकोला : नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने खरेदी केलेल्या १२५ वाहनांवर मनपाच्या वतीने ‘जीपीएस’ प्रणाली लावल्या जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडे विविध पाच कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या असून, शनिवारी निविदा उघडल्या जातील. शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्याच्या उद्देशातून महापालिकेने नागरिक, व्यावसायिकांच्या दारात जाऊन कचरा जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८१ व दुसऱ्या टप्प्यात ४४ अशा एकूण १२५ नवीन वाहनांची खरेदी केली. सदर वाहनांवर स्वयंरोजगार तत्त्वावर खासगी चालकांची नियुक्ती केली. संबंधित वाहनचालकांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळखल्या जाते. नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याची साठवणूक अपेक्षित असताना काही वाहनचालक शहराच्या कानाकोपऱ्यात तसेच खुली जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा फेकून मोकळे होतात. यामुळे शहराचे व पर्यायाने शहरवासीयांचे स्वास्थ्य धोक्यात सापडण्याची शक्यता आहे. वाहनचालकांच्या कार्यप्रणालीवर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित वाहनांवर ‘जीपीएस’ प्रणाली लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यासाठी तीन वेळा निविदा प्रकाशित करण्यात आली. निविदा स्वीकारण्याच्या अखेरच्या दिवसपर्यंत मनपाकडे पाच कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. कंपन्यांमधील स्पर्धा पाहता कमी दराची निविदा सादर करणाऱ्या कंपनीची निवड केली जाईल. शनिवारी निविदा उघडल्या जाण्याची शक्यता आहे.