शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. सदस्यांना पहिल्यांदाच प्रमाणपत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:28 IST

जिल्हा परिषद सदस्यांप्रमाणेच राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून येणार्‍या सदस्यांना पहिल्यांदाच निवडून आल्याचे संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी गुरुवारी येथे दिली.

ठळक मुद्देराज्य शासनाचा निर्णय राज्य निवडणूक आयुक्तांची माहितीऑनलाइन अर्जांमुळे अवैध ठरणार्‍या अर्जांचे प्रमाण कमी!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद सदस्यांप्रमाणेच राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून येणार्‍या सदस्यांना पहिल्यांदाच निवडून आल्याचे संगणकीकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी गुरुवारी येथे दिली.ग्रामपंचायत निवडणुकांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी अकोला दौर्‍यावर आले असता, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरपंच पदांसाठी थेट जनतेतून निवडणूक घेण्यात येत असल्याने, ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांमध्ये मतदारांना एक मतदान अधिक करावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांसाठी खर्चाची र्मयादा निश्‍चित करण्यात आली असून, मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर मतपित्रका लावण्यात येणार आहेत. त्यासाठी मतपित्रकांचे रंग निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सरपंच पदांसाठी फिका निळा रंगाची मतपत्रिका राहणार आहे, तर सदस्य पदांसाठी एससी प्रवर्गाकरिता -फिका गुलाबी, एसटी प्रवर्गासाठी -फिका हिरवा, ओबीसी प्रवर्गासाठी -पिवळा आणि सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या मतपित्रकांचा रंग पांढरा राहणार आहे, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.येत्या डिसेंबरपर्यंत पाच वर्षांचा कालावधी संपणार्‍या अकोला जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी १५ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३0 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावा लागेल. ऑनलाइन भरलेल्या उमेदवारी अर्जाची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करावी लागणार आहे, असेही राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपजिल्हाधिकारी (ग्रामपंचायत निवडणूक) अभयसिंह मोहिते उपस्थित होते.

५0 टक्के जागा आरक्षित; महिला पुढे येतील!ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५0 टक्के जागा आरक्षित आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणात पुढे येतील, असा विश्‍वास राज्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केला. 

जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागात आचारसंहिता!अकोला जिल्ह्यात एकूण ५३0 ग्रामपंचायतींपैकी २७२ ग्रामपंचायतींच्या म्हणजेच ५0 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने, निवडणुकांची आचारसंहिता जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागात लागू करण्यात आली आहे. परंतु, जेथे निवडणूक नाही, तेथे विकास कामांवर आचारसंहितचे कोणतेही बंधन नसल्याचेही राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.