शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाश्रीटकाळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अद्यापही फरार

By admin | Updated: June 30, 2014 01:53 IST

देयकासाठी दृष्टीबाधित शिक्षकाला मागितली लाच

अकोला: सर्वशिक्षा अभियानांतर्गत दृष्टीबाधित व अपंग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमावरील खर्चाचे देयक मंजूर करण्यासाठी ३000 रुपयांची लाच मागणारा बाश्रीटाकळी पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी अद्यापही फरारच आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत दृष्टीबाधित व अपंग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उ पक्रमासाठी विशेष शिक्षक म्हणून संजय मुळे मानधनावर कार्यरत आहेत. दृष्टीबाधित व अपंग विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यासाठी विविध शैक्षणिक उ पक्रम राबविले जातात. गेल्या वर्षभरामध्ये बार्शिटाकळी पंचायत समिती स्तरावर संजय मुळे यांनी विविध शैक्षणिक उपक्रम घेतले. या उपक्रमांवर झालेल्या खर्चाचे देयक त्यांनी गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत नथ्थुआप्पा पस्तापुरे यांच्याकडे सादर केले; परंतु लाचखोरीची लागण झालेल्या पस्तापुरे याने या अंध शिक्षकाकडे देयक मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली; परंतु मुळे यांनी स्पष्ट शब्दात पस्तापुरे याला नकार दिला. परंतु तरीही पस्तापुरे हा लाच देण्यासाठी मुळे यांच्यावर दबाब टाकीत होता. अखेर संजय मुळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ जून रोजी पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. संजय मुळे हे पैसे घेऊन गटशिक्षणाधिकारी पस्तापुरे याच्याकडे गेले असता त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात येण्याचे सांगितले. या ठिकाणीही मुळे गेले; परंतु गटशिक्षणाधिकारी पस् तापुरे याला संशय आल्याने तो पसार झाला. लाच मागितल्यानुसार बार्शिटाकळी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला**सेवानवृत्त होणार असताना लावला बट्टागटशिक्षणाधिकारी चंद्रकांत पस्तापुरे हा ३0 जून रोजी सेवानवृत्त होणार आहे; परंतु सेवानवृत्त होण्याच्या तीन-चार दिवसांपूर्वीच त्याने स्वत:वर लाचखोर असल्याचा बट्टा लावून घेतला. चंद्रकांत पस्तापुरे यांची कारकीर्द तशी वादग्रस्तच आहे. लाच घेतल्याशिवाय त्यांनी कोणतीही कामे केली नाहीत. लाच घेणे हा त्याने गोरखधंदाच बनविला होता. या गोरखधंद्याच्या जोरावर त्याने अमाप माया जमविल्याचे शिक्षण विभागात बोलल्या जात आहे. एका अंध शिक्षकाला मदत करण्याऐवजी गटशिक्षणाधिकारी पस्तापुरे याने लाच मागून आपल्या माणुसकीला काळिमाच फासला. त्याला अटक करून त्याच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी बार्शिटाकळी येथील शिक्षकांनी केली.