शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे शेतकरी हिताला प्राधान्य - तोमर

By admin | Updated: June 12, 2016 02:34 IST

बुलडाणा येथील पत्रपरिषदेत केंद्रीय पोलाद व खाद्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची माहिती.

बुलडाणा : केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली असून, विकासाची चाके गतीने फिरत आहेत. प्रत्येक वयातील, गटातील किंवा उत्पन्न र्मयादेतील नागरिकांच्या जीवनाला स्पर्श करतील, अशा योजना केंद्र व राज्य सरकारने राबविल्या असून, शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात सर्वात जास्त तरतूद कृषी व कृषी संलग्न क्षेत्राच्या विकासासाठी ठेवण्यात आली, अशी माहिती केंद्रीय पोलाद व खाद्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ११ जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत गतवर्षी प्रत्येक दिवसाला ९१ किलोमीटर ग्रामीण रस्त्याची निर्मिती करण्यात आल्याचे सांगत ना. तोमर म्हणाले, या योजनेमुळे देशात ३0 हजार ५00 किलोमीटर रस्ते तयार करण्यात आले आहेत. आपत्ती काळात महाराष्ट्राला मदत करताना केंद्र सरकारने कुठलाही आखडता हात घेतला नाही. एनडीआरएफ अंतर्गत केंद्र सरकारने राज्याला मागील दोन वर्षांत ५0 अब्ज १२ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो आतापयर्ंत सर्वात जास्त आहे. त्याचप्रमाणे कृषी मृदा आरोग्यपत्रिका वितरित करण्याचा मोठा कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी धडपड करणार्‍या युवकांना कर्ज वितरण करणे सोयीचे होणार आहे. या योजनेंतर्गत राज्यात ३८ लाख ६ हजारपेक्षा जास्त छोट्या उद्योजकांना १४ हजार ३८0 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. या योजनेसाठी यावर्षी अर्थसंकल्पात १ लाख कोटी रुपयांवरून १ लाख ८0 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही केंद्रीय मंत्री तोमर यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, आ.चैनसुख संचेती, जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे आदींची उपस्थिती होते.