शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य!

By admin | Updated: August 17, 2015 01:23 IST

अकोला येथील स्वातंत्र्य दिन समारंभात पालकमंत्र्यांची ग्वाही.

अकोला: जिल्हा शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती करीत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित जिल्ह्याच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्यासह स्वातंत्र्य संग्राम सैनिक, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या २00 गावांमध्ये करण्यात आलेल्या कामांची दखल घेऊन शासनामार्फत समाधान व्यक्त केले आहे. अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरवडून गेलेल्या जमिनीसह पीक नुकसानाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. सन २0१४-१५ या वर्षात शेतकर्‍यांच्या अल्पमुदती कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. तसेच विहित मुदतीत कर्ज हप्ता भरणार्‍या शेतकर्‍यांच्या कर्जावरील एक वर्षाचे व्याज माफ करण्यात आले असून, पुढील चार वर्षात कर्जावर सहा टक्के दराने व्याज आकारणी करण्यात येणार असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष दिले जणार असून, महत्त्वपूर्ण काम तडीस नेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असेही पालकमंत्री डॉ.पाटील यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन कार्यक्रम समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले.