शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

व्यापाऱ्यांना समजून घेणाऱ्या सरकारसोबत - बी. सी. भरतिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 13:47 IST

व्यापाऱ्यांना समजून घेणाऱ्या आणि त्यांना सन्मानाची वागणूक देणाऱ्या सरकारचे आम्ही आहोत. असे स्पष्ट मत कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी व्यक्त केले.

- संजय खांडेकरअकोला: व्यापाऱ्यांना समजून घेणाऱ्या आणि त्यांना सन्मानाची वागणूक देणाऱ्या सरकारचे आम्ही आहोत. कोणत्याही पक्षाचा आमच्यावर शिक्का लागलेला नाही, असे स्पष्ट मत कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी व्यक्त केले. वित्तीय संस्था आणि बँक यांच्या कर्जप्रकरणी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करण्यासाठी ते बुधवारी अकोल्यात येऊन गेले. त्यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद.प्रश्न : भाजप हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असे म्हटल्या जाते, ते खरे आहे का?उत्तर : २०१४ च्या निवडणुकीत व्यापारी मोठ्या प्रमाणात व्यापारी भाजपसोबत होते; मात्र जेव्हा भाजपने व्यापाऱ्यांच्या विरोधात निर्णय घेण्यास सुरुवात केली, तेव्हापासून व्यापाऱ्यांचा कोणताही पक्ष राहिला नाही. जर भाजप व्यापाऱ्यांचा पक्ष असता तर नोटाबंदी, जीएसटी आणि ई-कॉमर्ससारखे निर्णय त्यांनी घेतले नसते अन् आम्ही भाजपचे असतो, तर सरकारविरुद्ध देशभरात रथयात्रा काढली नसती. व्यापाऱ्यांना जे समजून घेतील, ते आमचे सरकार, ही व्यापाऱ्यांची आणि ‘कॅट’ची भूमिका आहे.प्रश्न : आता व्यापाऱ्यांची आणि ‘कॅट’ची पुढची दिशा काय आहे?उत्तर : आॅगस्ट ते डिसेंबर २०१८ पर्यंत ‘कॅट’ने सरकारविरुद्ध आंदोलन छेडल्यानंतर या सरकारने आमची दखल घेत आमचे म्हणणे ऐकून घेतले. ‘डीआयपीपी’चे नाव बदलून ‘डीआयआयटी’ करण्यात आले. व्यापाºयांचे मत जाणून घेण्यासाठी ट्रेडबोर्डची निर्मिती केली. त्यामुळे व्यापाºयांची बाजू समजून घेण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे.प्रश्न : सरकारकडून काय मोठे बदल अपेक्षित आहेत?उत्तर : सरकारने ई-कॉमर्स आणि जीएसटीच्या रिफंडमध्ये सांगितल्याप्रमाणे बदल केलेत. आता ‘एपीएमसी’च्या लिलाव कार्यप्रणालीत आम्हाला बदल हवा आहे. सोबतच भादंवि ४११ आणि ४१२ मधील कारवाईला आमचा विरोध आहे. टप्प्या-टप्प्याने आम्ही आमची बाजू सरकारसमोर ठेवणार आहोत.प्रश्न : कर्मचाऱ्यांसाठीच्या ईएसआयसी, पीएफ आणि प्रोफेशनल टॅक्समध्येही बदल नको का?उत्तर : कर्मचाऱ्यांना शासकीय सर्व योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे; मात्र त्या योजना खरेच लाभदायी आहेत की केवळ बुजगावणे आहे, याचा विचार झाला पाहिजे. ‘ईएसआयसी’च्या नावाने होणारी कपात आणि वैद्यकीय सेवा तकलादू वाटते. पीएफचा फायदा पाहिजे तसा कर्मचाºयांना होत नाही. सोबतच नोकरदार आणि इतरांकडून कपात होणारे प्रोफेशनल टॅक्स कशासाठी घेतले जाते, यावर विचार करण्याची वेळ आली आहे.प्रश्न : सरकारचे धोरण चुकले तर त्यांच्याविरुद्ध व्यापारी जातील काय?उत्तर : सरकार कोणतेही असो, व्यापाºयांना मारक ठरणारे धोरण जर येत असेल, तर ‘कॅट’ आंदोलनाचे शस्त्र उपसल्याशिवाय राहणार नाही. व्यापाºयांना समजून घेणाºया प्रत्येक सरकारचे आम्ही आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाचे आम्ही नाही.

 

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत