शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कापसाची शासकीय खरेदी सुरू ; सोयाबीनची लांबली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:18 IST

अकोला: कापसाची शासकीय खरेदी मंगळवारपासून अकोला येथे सुरू झाली असून, सोयाबीनची खरेदी लांबली आहे.

अकोला: कापसाची शासकीय खरेदी मंगळवारपासून अकोला येथे सुरू झाली असून, सोयाबीनची खरेदी लांबली आहे. दुसरा पर्याय नसल्याने शेतकºयांना सोयाबीन खासगी बाजारातच विकावे लागत आहे; पण यावर्षी सोयाबीन आणि कापसाचे दर बºयापैकी असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.राज्यातील कापसाची वेचणी अंतिम टप्प्यात आहे. तर सोयाबीनची काढणी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्याच्या प्रथम आठवड्यात संपली. सणासुदीचे दिवस असल्याने शेतकºयांना सोयाबीन, कापूस विकण्यावाचून दुसरा पर्याय नाही; पण मंगळवार २० नोव्हेंबरपासून अकोला जिल्ह्यातील कानशिवणी येथे हमी दराने शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ झाला; परंतु सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याने शेतकरी चिंतेत असताना सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असून, आजमितीस हे दर प्रतिक्विंटल ३,३२० ते ३,३२५ रुपयांवर पोहोचल्याने शेतकºयांची चिंता कमी झाली आहे. तथापि, काढणी हंगामाच्या सुरुवातीला अल्पभूधारक शेतकºयांनी २,४०० ते २,८०० पर्यंत सोयाबीन विकले. सोयाबीनचे हमी दर प्रतिक्विंटल ३,३९९ रुपये आहेत. त्या तुलनेत बाजरात ५५ ते ६० रुपये कमी असले तरी शेतकºयांकडील सोयाबीन थेट खरेदी केले जात आहे. शासकीय खरेदी केंद्रावर याच सोयाबीनसाठी प्रतवारीचे निकष लावण्यात आले असते. त्यामुळे शेतकरी सध्या समाधानी आहे.महाराष्टÑ राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाच्यावतीने येत्या आठवड्यात राज्यात ५० शासकीय कापूस खरेदी केंदे्र सुरू केली जाणार आहेत. अकोल्यात खरेदी केंद्र सुरू होण्याअगोदर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे कापूस खरेदीला प्रारंभ झाला आहे.

हमी दरापेक्षा बाजारात कापसाचे दर जास्त आहेत; पण हे दर कमी होऊ नये म्हणून, हमी दराने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. येत्या आठ दिवसात राज्यात ५० खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.- प्रसेनजित पाटील,उपाध्यक्ष, पणन महासंघ, बुलडाणा

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेतीcottonकापूस