शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, बेरोजगारांना रोजगार देणारे सरकार हवे! -  बसमध्ये प्रवाशांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 15:32 IST

अकोला: एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाचे केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र सत्ताधाऱ्यांनी शेतकरी व बेरोजगारांसाठी एकही चांगला निर्णय घेतला नसल्याने आज शेतकरी मेटाकुटीस आहे, तर बेरोजगार वणवण भटकत असल्याची चर्चा दहीगाव मार्गे जाणाºया अकोला ते सांगळुद या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मंगळवारी प्रवाशांमध्ये होती.

- सचिन राऊतअकोला: एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाचे केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र सत्ताधाऱ्यांनी शेतकरी व बेरोजगारांसाठी एकही चांगला निर्णय घेतला नसल्याने आज शेतकरी मेटाकुटीस आहे, तर बेरोजगार वणवण भटकत असल्याची चर्चा दहीगाव मार्गे जाणाºया अकोला ते सांगळुद या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मंगळवारी प्रवाशांमध्ये होती. मजबूत सरकार हवे; पण सर्वांना न्याय देणारे असावे असा या चर्चेचा सुर होत. अकोला ते मूर्तिजापूर या प्रवासादरम्यान विठ्ठलराव तायडे म्हणाले की अकोला लोकसभा मतदारसंघात विकास सुरू आहे; मात्र रस्ते अनेक गावात पाण्याची सुविधा अद्यापही नसल्याचे सांगितले, तर अंकुश गावंडे यांनी मोदी सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे केवळ देशातील जनतेला त्रासच झाला आहे. शेतकरी व गोरगरिबांसाठीच्या योजनेच्या त्यांच्यासह राज्य सरकारने केवळ भूलभुलय्या केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापही पूर्णपणे मिळाली नसून, अभ्यास करणारे हे सरकार आता राज्यात नको असल्याची प्रतिक्रिया दिली. याच बसमध्ये काही विद्यार्थीही उपस्थित होते. त्यामधील प्रियंका खंडारे या विद्यार्थिनीने देशातील रोजगाराचा विषय प्रचंड गंभीर असून, सरकारने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सतीष खिरडकर यांनी मोदी सरकारने एकही नोकरी दिली नसून, राज्य सरकारनेही केवळ जाहिरात काढल्या; मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ अद्याप एकाही बेरोजगारास झालेला नाही. त्यामुळे हे सरकार फसवे असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आता वाद-विवाद आणि खोट्या घोषणा देणाºया सरकारपेक्षा वास्तविकतेमध्ये काम करणारे सरकार हवे असल्याचे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले.काँग्रेस,भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजूकाँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही राजकीय पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मतही प्रवाशांनी व्यक्त केले; मात्र त्यातही काही नेते काम करणारे असल्याने त्यांच्यासाठी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान करीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. प्रत्येक सफरचंदाला कुठेना कुठे डाग असतो म्हणून आपण पूर्ण सफरचंद फेकून देत नाही, तर डाग असलेला भाग काढून इतर सफरचंद खाण्यासाठी वापरतो. राजकारणही याच प्रकारे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक