शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने तूर खरेदी करावी; अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 02:00 IST

भारिप-बमसं, शेतकरी जनआंदोलन कृती समितीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप त्वरित व्हावे, या मागणीसाठी ७ जुलै रोजी भारिप-बमसं कार्यकर्ते सुभाष रौंदळे, जीवन बोदडे, अशोक दारोकार, प्रदीप तेलगोटे, प्रा. संजय हिवराळे, रमेश दारोकार यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तेल्हारा तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. शासनाने तुरीची खरेदी व मोजमाप त्वरित करावे; अन्यथा भारिप-बमसं तेल्हारा तालुका व शेतकरी जनआंदोलन कृषी समिती तेल्हारा तालुकाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.शासनाच्या १६ मे २०१७ च्या निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार ३१ मे पावेतो ज्या शेतकऱ्यांकडे तूर विक्री बाकी आहे, अशांनी ३१ मे पावेतो बाजार समिती कार्यालयात नाव नोंदणी अर्ज व कागदपत्रे सादर करावी. त्यानंतर बाजार समितीत तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना मोजमापाकरिता क्रमवारीसंदर्भात शेतकऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून बोलावून, अशा शेतकऱ्यांना मोजमापानुसार टोकन वितरित करेल, असे कळविण्यात आले होते. त्यासंदर्भात तेल्हारा बाजार समितीकडे ३१ मे पावेतो २,७४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पाच वाहनांसह तसेच ७५ शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात १२५० क्विंटल पोत्यांच्या गंजीसह तूूर माल विक्रीसाठी ठेवला आहे. त्यापैकी बाजार समितीने ८५ शेतकऱ्यांना टोकन वितरित केले. त्या ८५ टोकनपैकी खविसं व नाफेड यांनी १ जून रोजी ३८ शेतकऱ्यांना टोकन दिले. परंतु, दीड महिन्यचिंा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप ४५ दिवसांपासून बंद आहे. मोजमापाच्या कामात दिरंगाई करणारे कर्मचारी दोषी असतील, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच तत्काळ चुकारे करण्यात यावेत, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, जिल्हा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी अकोला, डीएमओ जिल्हा मार्केट फेडरेशन अकोला, उपविभागीय अधिकारी अकोट, सहायक निबंधक तेल्हारा यांना पाठविण्यात आल्या आहेत.