शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या महसूल विभागामार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचा आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 02:46 IST

अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे बाधित शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी कपाशी पिकाच्या  नुकसानाचे पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत गुरुवारी  राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला. त्यानुषंगाने अमरावती विभागातील  पाचही जिल्हय़ांत कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा  प्रशासनामार्फत सुरू करण्यात  येणार आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील पंचनामे सोमवारपासून!

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे बाधित शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी कपाशी पिकाच्या  नुकसानाचे पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत गुरुवारी  राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला. त्यानुषंगाने अमरावती विभागातील  पाचही जिल्हय़ांत कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा  प्रशासनामार्फत सुरू करण्यात  येणार आहे. राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी  बोंडअळीचा प्रादुर्भाव  झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच तुडतुडे  रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने कपाशी व  धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्‍यांना पीक नुकसान भपाईची मदत  देण्याची मागणी होत आहे. या पृष्ठभूमीवर बाधित शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी पीक  नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचा निर्णय ५ डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या  बैठकीत घेण्यात आला. त्यानुषंगाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे आणि  तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावाने धान पिकाच्या नुकसानाचे दहा दिवसांत पंचनामे  करण्याचा आदेश शासनाचे उपसचिव सु. ह. उमराणीकर यांनी ७ डिसेंबर रोजी  राज्यातील विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. शासन  आदेशानुसार अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व  यवतमाळ या पाचही जिल्हय़ांत जिल्हा प्रशासनामार्फत कपाशी पिकाच्या नुकसानाचे  पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील पंचनामे सोमवारपासून!जिल्ह्यात कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्याच्या मुद्यावर जिल्हाधिकारी  आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित  अधिकार्‍यांची बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील राजस्व, कृषी व संबंधित  विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर सोमवार, ११  डिसेंबरपासून जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे  करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती