शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जलजगृतीसाठी शासनाचा पुढाकार!

By admin | Updated: March 3, 2016 02:02 IST

जलसंपदा विभागाद्वारे १६ ते २२ मार्च दरम्यान राज्यात जलजागृती सप्ताह.

अकोला : शेतकरी,नागरिकामध्ये राज्यभरात जलजागृती करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. कृषी, पाणीपुरवठा, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास व नगरविकास आदी विभागांमार्फत जलजागृतीसाठी आठवडाभर विविध उपकम, प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जाणार आहेत. राज्यातील एकात्मिक पाणी नियोजन, सिंचन प्रकल्पांची उभारणी आणि व्यवस्थापनाची महत्वाची जबाबदारी जलसंपदा विभागावर असल्याने या विभागाला जल जन जागृतीवर भर द्यावा लागणार आहे.राज्यात १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षी किमान १0 टक्के सिंचन कार्यक्षमता वाढविण्याचे उद्दीष्ट जलसंपदा विभागाला देण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस स्वत: या उपक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या सप्ताहाबाबत सर्वच स्तरावर जोमाने तयारी सुरू आहे. प्रत्येक जिल्हयात संबधित विभाग जोमाने कामाला लागले आहेत. जलसंपदा विभागातंर्गत बांधकाम, सिंचन व्यवस्थापन, सर्वेक्षण, संकल्पन, संशोधन या कार्यप्रकारातील कार्यालये, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) नाशिक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेटा) नाशिक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे, इत्यादी संस्था हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यासाठी विविध समित्याही तयार करण्यात आल्या आहेत.या सप्ताहात पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापन, बांधकामाधीन प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यात येईल. सिंचन कायदे, कोल्हापुरी बंधार्‍यांना दरवाजे बसवणे, भूसंपादन, पुनर्वसन, लाभधारकांच्या अडचणी, लाभ क्षेत्रातील प्रत्येक गावात, तालुका ठिकाणी, जिल्हास्तरावर लाभधारक, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी- कर्मचार्‍यांच्या सभा, बैठका, मेळावे, व्याख्यानांचे आयोजन केले जाणार आहे. पाण्याचे महत्व, शासनाचे उपक्रम, पाणी बचतीबाबत उपाय, आधुनिक सिंचन पध्दती याबाबतची घोषवाक्ये, माहितीदर्शक चित्रफीती, फलक अशा विविध माध्यमातून या सप्ताहात जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणीदरम्यान शासनस्तरावरू न मार्गदर्शन व समन्वय राखण्यासाठी डॉ. संजय बेलसरे, स. को. सब्बीनवार, अधिक्षक अभियंता व उपसचिव, हे नोडल अधिकारी म्हणून काम बघणार आहेत.